Breaking News

संतोष मांजरेकरचा अॅक्शनपॅक्ड ‘बेधडक’ बऱ्याच मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा आगमन

मुंबई : प्रतिनिधी

अलीकडच्या काळात ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत क्रांती घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या सिनेमाची आठवण होताच प्रथमर्शनी जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपातील महेश मांजरेकर आणि दिनकर भोसले या सर्वसामान्य व्यक्तीच्या भूमिकेतील सचिन खेडकर यांचे चेहरे डोळ्यांसमोर येत असले तरी या दोघांना सक्षमपणे पडद्यावर सादर करणाऱ्या दिग्दर्शक संतोष मांजरेकरला विसरता येत नाही. या सिनेमानंतर जणू सिनेसृष्टीतून गायबच झालेला संतोष एका अॅक्शनपॅक्ड सिनेमासह परतला आहे.

मध्यंतरीच्या काळात पडद्यामागे राहून सिनेमांच्या जडणघडणीत मोलाचं कार्य करणारा संतोष मराठी प्रेक्षकांसाठी ‘बेधडक’ हा अॅक्शनपॅक्ड सिनेमा घेऊन आला आहे. संतोषच्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सिनेमाप्रमाणेच ‘बेधडक’ हा सिनेमाही मरठीत अॅक्शनपटांचा नवा ट्रेंड सुरू करणारा ठरेल असं बोललं जात आहे. ‘बेधडक’चं पहिलं टायटल पोस्टर जानेवारीमध्ये प्रदर्शित करण्यात आलं होतं. तेव्हापासूनच या चित्रपटानं उत्सुकता निर्माण केली होती. आता या चित्रपटाचं टीजर पोस्टर सोशल मीडियात नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये बॉक्सिंग ग्लोव्ह्ज घातलेला बलदंड हात दिसत आहे. सोबत ‘सामान्य स्वप्नांचा, असामान्य पाठलाग’ अशी टॅगलाईनही आहे. त्यावरून हा चित्रपट बॉक्सिंगवरचा आणि अॅक्शनपॅक्ड असणार हे स्पष्ट होत आहे.

राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांनी चित्रपटाचं लेखन, सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे. गिरीश टावरे याचं अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून

अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. ‘बेधडक’ अॅक्शनपॅक्ड सिनेमाद्वारे पिळदार शरीरयष्टी असलेल्या नव्या अभिनेत्याचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होणार आहे. दिग्दर्शन जरी संतोषचं असलं तरी अभिनेता म्हणून मराठी प्रेक्षकांवर छाप पाडण्यात गिरीश कितपत यशस्वी होतो ते पाहायचं आहे.

Check Also

कंगना राणावत चे पुन्हा मोठे विधान; भगवान श्री कृष्णाची कृपा झाली तर …. चित्रपट सृष्टीपाठोपाठ कंगना या क्षेत्रात काम करण्यास उत्सुक

कंगना राणावत राजकीय असो की सामाजिक, प्रत्येक मुद्द्यावर आपलं मत उघडपणे मांडताना दिसून येते. कंगनाला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *