Breaking News

लॉकडाउनमध्ये भटकणाऱ्या दुचाकीस्वाराची कर्मचारी महिलेला धडक महिला रूग्णालयात दाखल तर स्वार पळून जाण्यात यशस्वी

ठाणे: प्रतिनिधी

ठाणे महापालिकेच्या एका कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला एका बाईक स्वाराने जोरदार धड़क दिली. ज्यामधे ही महिला गंभीर जख्मी झाली आहे, ठाण्याच्या पोखरण नंबर २ रस्त्यावर रोज प्रमाणे कंत्राटी महिला सफाई कर्मचारी संगीता पोफळकर या रस्ते सफाईचे काम करत होत्या, लॉक डाउन असताना एक युवक अतिवेगाने मोटर सायकलवर आला आणि त्याने थेट महिला सफाई कर्मचारी संगीता पोफळकर यांना धडक दिली. काल सकाळी ही घटना झाल्याचे उघडकीस आले.

धडक एवढी जोरदार होती कि मोटर सायकलची नंबर प्लेट तुटुन खाली पडली, धडक देणाऱ्या मोटरसायकल चा नंबर एम एच ०४ ईआर ९२५४ असून मोटरसायकल चालविणाऱ्या इसमाने टी शर्ट आणि बरमूडा परिधान केली होता. कंत्राटी सफाई कर्मचारी महिलेला धडक दिल्यानंतर तिच्या अन्य महिला सफाई कर्मचारी महिलांनी धडक मारणाऱ्या आरोपीला पकडायचा प्रयत्न केला, पण त्यामहिलांना धक्का बुक्की करून दुचाकीस्वार पळून जाण्यात यशस्वी झाला. संगीता यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना ठाण्याच्या बेथनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून शहराची साफ सफाई करत आहेत. त्यांना देवदुताची उपमा मिळत आहे, अशावेळी त्यांना मदतीचा हात देणे आवश्यक असताना एका दुचाकीस्वाराने सफाई कर्मचारी महिलेस धडक देवून जख्मी केले आणि तो मोटर सायकलस्वार पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यामुळे पोलिसांकडून सदर दुचाकीस्वाराला अटक करून जख्मी महिलेला न्याय मिळेल का याची आस तिच्या कुटुंबियांना लागली आहे.

 

Check Also

दृष्टिबाधित व्यक्तींसाठी समावेशक ॲटलासचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

दिव्यांग व्यक्तींना देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे. दिव्यांगांना शिकविण्यात येणारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *