Breaking News

Tag Archives: cm thackeray

‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ मध्ये भाग घ्यायचाय तर मग १५ जून पर्यत अर्ज करा कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक स्टार्टअप्सनी www.msins.in/startup-week या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी केले. दरम्यान सहभागासाठी अर्ज करण्याची मुदत …

Read More »

राज्य सरकारही आता कोविडवरील लस आणणार : हाफकिन करणार संशोधन आधुनिकीकरण करण्यास शासन संपूर्ण मदत करणार-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी भारताला पोलिओ मुक्त करण्यात मोठा वाटा देणाऱ्या हाफकिन इन्स्टिट्यूटने गेल्या सहा महिन्यात जवळपास २८ कोटीहून अधिक लसीची निर्मिती केली आहे, ही बाब अभिनंदनीय नक्कीच आहे. मात्र राज्याची सध्याची परिस्थिती पाहता कोविडवरील लसीसाठी हाफकिन इन्स्टिट्यूटने संशोधन लवकर करणे आवश्यक असून लस तयार करण्यात हाफकिन इन्स्टिट्यूट यशस्वी ठरल्यास ही …

Read More »

देशातील पहिल्या समुद्राखालून जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा मुंबईत शुमारंभ 'मावळा' टीबीएम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्यान्वित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे तंत्रज्ञान, विज्ञान असेल ते आणण्याची आपली परंपरा कायम ठेवणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बृहन्मुंबई महापालिकेच्या सागरी किनारा …

Read More »

दोन नव्या पुरस्कारांसह शेतकऱ्यांचा करणार सन्मान आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार असल्याची कृषी मंत्री भुसे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. यावर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. …

Read More »

कंगनाला द्यायची नुकसानभरपाई व वकिलांची फी मुख्यमंत्री ठाकरेंच्या खिशातून द्या आ. अतुल भातखळकर यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कंगना राणावतच्या घरावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा निर्णय देत उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला जोरदार चपराक लगावली आहे. मुंबई महानगरपालिकेकडून सूडबुद्धीने करण्यात आलेल्या कारवाईचा बोलविता धनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच होते, त्यामुळे ‘उखाड दिया’ म्हणणाऱ्यांनाच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाद्वारे ‘उखाड दिया हैं’ अशी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली …

Read More »

खुशखबर: अनुसूचित जमातीमधील या विद्यार्थ्यांना मिळणार २६ हजाराचे आर्थिक सहाय्य मंत्री अॅड. के.सी. पाडवी यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा मुख्य परीक्षेची व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्य करण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत  परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना दरमहा १२ हजार रुपये विद्यावेतन व १४ हजार रुपये पुस्तक खरेदीसाठी असे एकूण २६ हजार रुपये देण्यात …

Read More »

मास्कच्या किंमतीचा शासन निर्णय जाहीर: चढ्या किंमतीविरोधात येथे तक्रार करा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून महाराष्ट्र देशात अग्रेसर ठरले आहे. राज्यात आता एन ९५ मास्क १९ ते ४९ रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार आहे. आज …

Read More »

यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबई : प्रतिनिधी कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केली. न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे …

Read More »

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील अनुकंपा तत्वावरील १२४ पदे तातडीने भरणार मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्वावरील पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला असून गट- क व गट – ड मधील विविध संवर्गातील १२४ पदांची भरती करण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. २२ मार्च २०१२ …

Read More »

कोरोना: राज्यातील रूग्ण संख्या पहिल्यांदाच १० हजारापार ५५५२ जण घरी तर २८० जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी राज्यात सर्वाधिक १० हजार ५७६ बाधित रूग्ण आढळून आले असून आतापर्यंतची २४ तासातील ही सर्वाधिक संख्या आहे. तर आज ५५५२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ८७ हजार ७६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाबाधितांच्या सर्वाधिक संख्येमुळे बाधितांची संख्या १ लाख ३६ हजार ६०७ रुग्णांवर …

Read More »