Breaking News

१ कोटी ७७ लाख लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या टिकटॉक कडून ५ कोटी कंपनीकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

मुंबई: प्रतिनिधी
लॉकडाऊन काळात समाजमाध्यमातून लोकांशी संवाद साधल्यानंतर पुन्हा विविध माध्यमातून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी टिकटॉक अॅपचा फायदा झाला असून अल्पावधीतच १ कोटी ७७ लाख नागरिकांपर्यत सहजरित्या पोहोचता आले. त्याच टिकटॉक कंपनीने राज्याच्या कोविड विरोधी लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५ कोटी रूपयांची मदत दिली.
टिकटॉक कंपनीने (बाईट डान्स (इंडिया) टेक्नॉलॉजी, प्रा. लि) कोविड विरुद्ध च्या लढ्यात नोंदविलेल्या सहभागाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीला मनापासून धन्यवाद दिले.
टीकटॉक इंडियाचे प्रमुख निखील गांधी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयास पत्र पाठवून कोविड १९ विरुद्धच्या त्यांच्या लढ्याची माहितीही कळवली आहे. ते म्हणतात की, मुंबई आणि महाराष्ट्रात टिकटॉकच्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजारावर असून राज्याप्रतीच्या सामाजिक दायित्वाची त्यांना जाणीव आहे. महाराष्ट्र पोलीसदलातील कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने गृह विभागाला एक लाख मास्क उपलब्ध करून दिल्याची माहिती ही त्यांनी दिली आहे
टिकटॉक वापरकर्त्यांपर्यंत कंपनीने कोविड १९ संदर्भातील माहिती ऑनलाईन पद्धतीने पोहोचवून जनजागृतीचे काम केले आहे. कोविड १९ युद्धात सहभागी होण्यासाठी टिकटॉक ॲपवर लाईव्ह डोनेशन जमा करण्याच्या व्यवस्थेसह या मदत कार्यात सहभागी होण्याचे आवाहन कंपनीकडून करण्यात येत आहे.
या जागतिक आपत्तीमध्ये जबाबदार कॉर्पोरेट सिटिझन म्हणून कोविड १९ विषाणु विरूद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी, सहकार्य करण्यासाठीच कंपनीने ही पाऊले उचलल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘घरातच रहा’ हा आणि अत्यावश्यक म्हणून बाहेर पडल्यास ‘सोशल डिस्टन्सिंग’ चा नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यातही मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी जनतेला आणि काही प्रसंगी विविध घटकांशी थेट संपर्क साधण्यासाठी समाज माध्यमांवर भर दिला.
त्यादृष्टीने समाज माध्यमातील फेसबुक, ट्विटर आणि व्हिडीओ कान्फरन्सिंगचा प्रभावी वापर करणे सुरु केला आहे. फेसबुक लाईव्ह, ट्विटर वरील थेट प्रसारणामुळे कमीत कमी साधन सामुग्री आणि मनुष्यबळामुळे व्यापक स्तरावर संपर्क प्रस्थापित करणे शक्य झाले.

Check Also

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *