Breaking News

आता दोन आठवड्यांचा लॉकडाऊन : परतणाऱ्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या केंद्र सरकारकडून अध्यादेश जारी

मुंबई-नवी दिल्ली: प्रतिनिधी
देशभरातील २ रा लॉकडाऊनचा टप्पा संपायला अवघे दोन दिवस शिल्लक राहीलेले असताना ४ ते १७ मे दरम्यानच्या तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. तसेच स्थलांतरीत कामगार, पर्यटक, विद्यार्थी यांना त्यांच्या इच्छित स्थळी अर्थात मुळ गावी पोहोचविण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या चालविण्यात येणार असल्याची घोषणाही रेल्वे मंत्रालयाने गृह मंत्रालयाच्या हवाल्याने केली.
या तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये ३० एप्रिल नंतर प्रत्येक कोरोनाबाधीत जिल्ह्यातील बाधीत रूग्णांची आणि मृत्यूची माहिती घेवून त्यानुसार रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोनची नव्याने घोषणा करण्यात येणार आहे. मात्र सध्याच्या रेड झोनमधील भागांना अर्थात जिल्ह्यांना लॉकडाऊनमध्ये सूट देण्यात येणार नसल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.
याशिवाय रेल्वेचे वेळापत्रकही पुढील अंतिम टप्प्यातील आकडेवारी हाती आल्यानंतर विभागानुसार त्या चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे विभागाने जाहीर केले.
या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करत पुन्हा एकदा लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु आता केंद्रीय गृहमंत्रालयानं पत्रक काढून लॉकडाउनचा कालावधी वाढवणार असल्याची घोषणा करण्यात आली.
दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त सवलती देण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. परंतु रेड झोनमध्ये कोणतीही सवलत देण्यात येणार नाही. रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत. ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे. तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *