Breaking News

माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर

मुंबईः प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.
लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे अध्यक्ष पद रिक्त होते. त्यामुळे त्यांच्या ठिकाणी नव्या अध्यक्षाची नियुक्ती करावी यासाठी काही गटाकडून केंद्रीय नेतृत्वाकडे लॉबींगही करण्यात येत होते.
अखेर या सर्वांना दूर सारत दक्षिण मध्यचे माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबईच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने गायकवाड यांच्या स्वरूपात दलित समाजाला प्रतिनिधत्व देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Check Also

ED चे आदेश प्रताप सरनाईक हाजीर हो.. क्वारंटाईन कालावधी संपल्यावर हजर राहा

मुंबईः प्रतिनिधी एमएमआरडीतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर मंगळवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *