Breaking News

उद्धवजी, आतातरी जनतेची दिशाभूल करणं सोडा ! भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्याना टोला

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने एका खाजगी संस्थेला स्वतःच्या जनसंपर्कासाठी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यासाठी काही दिवसांपूर्वी सुमारे ६,००,००,०००  रुपयांचे टेंडर काढले. राज्य सरकारला असे वाटत आहे की जनतेचा त्यांच्याविषयी असलेला दृष्टिकोन बदलण्यात त्या संस्थेने मदत करावी. म्हणजे सरळ सरळ जनतेची दिशाभूल करून त्यांना चुकीच्या दिशेने नेण्यास परावृत्त करावे असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

त्या सहा कोटींमध्ये २५ ते ३० हजार लोकांच्या कोरोना चाचण्या झाल्या असत्या हा तरी विचार राज्य सरकारने करायला हवा होता असा उपरोधिक कोपरखळी लगावत उद्धवजी, तुमची प्रतिमा चांगली वाईट कशीही असो, या कठीण काळात कमीत कमी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही याची तरी  काळजी घ्या असा उपरोधिक सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

Check Also

संजय राऊतांना देवेंद्र फडणवीसांचे प्रति आव्हान ईडीला भाजपा नेत्यांची नावे द्याच

मुंबईः प्रतिनिधी शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईमुळे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *