Breaking News

काँग्रेसची टीका, राजीनामा मंजूर करून केंद्राने कोश्यारींचा सन्मान केला तर महाराष्ट्राचा अवमान कोश्यारींच्या पापाची फळे भाजपाला भोगावी लागतील

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी न करता त्यांचा राजीनामा मंजूर करून केंद्र सरकारने कोश्यारींचा सन्मान आणि महाराष्ट्राचा अवमान केला आहे. भगतसिंह कोश्यारीच्या आडून भारतीय जनता पक्षाने सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमानच केला. कोश्यारींनी राजभवनासारख्या घटनात्मक संस्थेचा भाजपा कार्यालयाप्रमाणे वापर करून राजकारणाचा अड्डा बनवले होते. कोश्यारींच्या हाताने महाराष्ट्रद्रोही भाजपने जी पापे केली …

Read More »

पत्रकार वारिशे हत्याप्रकरणी संजय राऊतांनी ट्विट करत केला या नेत्यांकडे अंगुली निर्देश हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीवर कंपनीचा लोगो तर कंपनीसाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर साधला निशाणा

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शशिकांत वारिशे यांचा रत्नागिरीतील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध होता. याबाबतच्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या होत्या. याच कारणामुळे शशिकांत वारिशे यांना चिरडून मारण्यात आलं, असा संशय विरोधी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच अंगणेवाडीत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे …

Read More »

नाना पटोलेंची मागणी, शेतकरी लाठीचार्जची विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करा शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलिस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा

शेतमालाला दववाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलिस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, अशी …

Read More »

राज्यपालांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार म्हणाले, अतिशय चांगला निर्णय हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता

महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योती महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि मुंबईबाबत अनादर व्यक्त करणारे वक्तव्य करत मराठी जनतेची मने दुखावणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना हटविण्याची मागणी सातत्याने विरोधकांकडून करण्यात येत होती. मात्र भाजपाला पोषक अशी भूमिका राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून घेण्यात येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री …

Read More »

पंतप्रधानांसोबतच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरविल्यानंतरच राज्यपाल कोश्यारी पदमुक्त फक्त स्वागत आणि निरोपाला हजर रहात आपली नाराजी पहिल्यांदाच दाखविली

काही दिवसांपूर्वी राज्याच्या राज्यपाल पदावरून मुक्त करण्यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केली. त्यानंतरही पंतप्रधानांनी त्यांच्या इच्छेनुसार पदमुक्त केले नसल्याने वीस दिवसाच्या अंतराने मुंबईत दुसऱ्यांदा आलेल्या पंतप्रधान मोदीसोबत कार्यक्रमाला हजर राहण्यास असमर्थता दाखवित पहिल्यांदाच आपल्या कृतीतून दाखवून दिले. त्यानंतर लगेच एक दिवसाच्या …

Read More »

भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी केला एकत्र प्रवास, दिले हे कारण नाशिकमधील भाजपा प्रदेश कार्यक्रमाच्या निमित्ताने केला प्रवास

अलीकडच्या काही दिवसांपासून भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी गैरहजरी लावली होती. अशातच आज ११ फेब्रुवारी रोजी पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी एका कारमधून प्रवास केला. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. भाजपाची दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणी बैठक शुक्रवारपासून नाशिकमध्ये सुरु …

Read More »

देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, हे खुद्दारांच सरकार, अपात्र ठरतील हे शिल्लक राहिलेल्यांसाठी… प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत फडणवीसांनी घेतला आदित्य ठाकरे यांच्या टीकेचा समाचार

विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर लगेच कसबा आणि पिंपरी-चिंचवड जागेसाठी पोटनिवडणूकीला सामोरे जावे लागत आहे. शिवाय या निवडणूकीनंतर मुंबईसह १४ महापालिकेच्या निवडणूका जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिक येथे पार पडली. या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मंत्र्यासह प्रवक्त्यांना दिली तंबी, फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतील …. वायफळ बडबड, राजकिय मुद्यांवर कोणी बोलायचे नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात दौरे झाले. त्यापैकी मुंबईत तर एकाच महिन्यात दोनवेळा आले. त्यावरून राज्यात आगामी होऊ घातलेल्या मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या तयारीला रंग चढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणूक तयारीचा भाग म्हणून …

Read More »

अजित पवार पैठणमध्ये तुफान टोलेबाजी करत म्हणाले, मंत्री झाल्यावर भुमरेंनी ९ दारूची दुकाने… पैठण तालुक्यात काँग्रेसने, राष्ट्रवादीने साखर कारखाने, एमआयडीसी, महाविद्यालय दिल्या

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मी सकाळी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो. तर काहीजण टाकायलाच सुरुवात करतात असे वक्तव्य करत नेमका नेमका कोणावर टीका केली याविषयीची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आज पैठणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी थेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यावरच निशाणा साधला. …

Read More »

‘उष्णतेच्या लाटा आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन’ विषयक कार्यशाळा १३ आणि १४ फेब्रुवारीला होणार आयआयटीमध्ये परिषद

‘उष्णतेच्या लाटा – आपत्ती उपाययोजना आणि व्यवस्थापन करणे’ या विषयावर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण, भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी मुंबई), नागपूर येथील विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था आणि महाराष्ट्र शासनाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरण यांच्या संयुक्त विद्यमाने १३ आणि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. यामध्ये देशातील विविध राज्यातील व …

Read More »