Breaking News

भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मंत्र्यासह प्रवक्त्यांना दिली तंबी, फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतील …. वायफळ बडबड, राजकिय मुद्यांवर कोणी बोलायचे नाही

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. त्यानंतर जवळपास तीन वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्रात दौरे झाले. त्यापैकी मुंबईत तर एकाच महिन्यात दोनवेळा आले. त्यावरून राज्यात आगामी होऊ घातलेल्या मुंबईसह १४ महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या तयारीला रंग चढण्यास सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट झाले. या निवडणूक तयारीचा भाग म्हणून भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीची बैठक नाशिकमध्ये पार पडली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या मंत्र्यांसह पक्ष प्रवक्त्यांना वायफळ आणि राजकिय भाष्य करू नका अशी तंबी देत फक्त राजकीय भाष्य देवेंद्र फडणवीसच करतील असे फर्मान जारी केले.

नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणूकीत भाजपाचा दोन जागांवर पराभव झाला. त्या पार्श्वभूमीवर या प्रदेश कार्यकारणीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मंत्र्यानी फक्त स्वतःच्या विभागाशी संबंधित विषयांवरच बोलावे. त्यांनी राजकीय विषयांवर भाष्य करू नये. देवेंद्र फडणवीस हेच फक्त राजकीय विषयांवर बोलतील. तसेच भाजपच्या प्रवक्त्यांनी वायफळ विषयांवर बोलू नये, अशी ताकीदही दिली.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष चांगलाच कामाला लागला आहे. राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकांची चर्चा आहे. या निवडणुकांनंतर राज्यात महापालिका निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. विशेष म्हणजे या पोट निवडणुकांनंतर लगेच महापालिकांच्या निवडणूका जाहिर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून त्यानंतर लगेच पुढच्यावर्षी लोकसभा निवडणुका होतील. त्यानंतर लगेच काही महिन्यांनी विधानसभा निवडणूक पार पडेल. या सर्व निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप चांगलीच कामाला लागली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीसाठी ‘महाविजय २०२४’ म्हणून संकल्प केला. तर आमदार श्रीकांत भारतीय निवडणूक इन्चार्ज म्हणून काम पाहणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी केली. तसेच या कार्यकारिणीच्या बैठकीत मराठी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी यावेळी भाजपात प्रवेश केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *