Breaking News

पत्रकार वारिशे हत्याप्रकरणी संजय राऊतांनी ट्विट करत केला या नेत्यांकडे अंगुली निर्देश हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीवर कंपनीचा लोगो तर कंपनीसाठी पुढाकार घेणाऱ्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यावर साधला निशाणा

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्या प्रकरणावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून शशिकांत वारिशे यांचा रत्नागिरीतील नाणार येथे होणाऱ्या रिफायनरीला विरोध होता. याबाबतच्या अनेक बातम्या त्यांनी दिल्या होत्या. याच कारणामुळे शशिकांत वारिशे यांना चिरडून मारण्यात आलं, असा संशय विरोधी पक्षाकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच अंगणेवाडीत झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सभेनंतर दुसऱ्याच दिवशी हे प्रकरण घडले. त्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या सभेतील तो नेता कोण असा सवाल तरत वारिशे हत्याप्रकरणाची सुई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याकडे केली.

संजय राऊत यांनी पत्रकार शशिकांत वारिशे यांची हत्या हे एक षडयंत्र आहे, असा आरोप करत त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत काही पुरावेही सादर केले आहेत. शशिकांत वारिशे यांना ज्या वाहनाने धडक दिली, ते वाहन पंढरी आंबेकर यांचीच आहे. तसेच संबंधित वाहनाच्या मागील बाजूस रिफायनरी कंपनीचा लोगोही आहे.

शिवाय हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी पंढरी आंबेकर हा अंगणेवाडी येथील जत्रेत हजर होता. याच दिवशी अंगणेवाडीत भाजपाने शक्तीप्रदर्शन करत जाहिर सभा आयोजित केली होती. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हेही उपस्थित होते. हाच धागा पकडून संजय राऊतांनी शशिकांत वारिशे यांच्या हत्येबाबत सवाल उपस्थित केला. वारिशे यांच्या हत्येच्या आदल्या दिवशी आरोपी आंबेकर अंगणेवाडीच्या जत्रेत कोणत्या नेत्यांना भेटला? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

संजय राऊतांनी आपल्या ट्विटवरील पोस्टमध्ये लिहिलं, ही पंढरी आंबेकरची गाडी आहे. गाडीच्या मागच्या बाजुला रिफायनरी कंपनी RRPCL चा लोगो आहे. ह्याच कंपनीत ‘सौदी अरेबिया’च्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. शशिकांत वारिशे यांची हत्या हे एक षडयंत्र आहे. आंबेकर अंगणेवडी जत्रेत हजर होता. ते अनेक नेत्यांना भेटला. संबंधित नेते कोण होते? अंगणेवाडीच्या जत्रेनंतर दुसऱ्या दिवशी शशिकांत मारला गेला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *