Breaking News

Editor

राणा दांम्पत्याच्या टीकेवर अजित पवार म्हणाले, राज्यकर्त्ये जबाबदार … राज्यशासन, विरोधी पक्ष व स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातूच मेळघाटातील कुपोषण,बालमृत्यूच्या समस्येवर तोडगा शक्य...

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यूच्या घटनांना सर्वच राज्यकर्ते जबाबदार असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा राजकारणाच्या पलिकडे जाऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. मुलींची कमी वयात लग्न, दोन गरोदरपणातील कमी कालावधी, अंधश्रद्धेमुळे डॉक्टरांकडे न जाण्याची मानसिकता, पोषक आहाराचा अभाव, माता आरोग्याबद्दलची अनास्था अशा अनेक कारणांमुळे मेळघाटात कुपोषण व बालमृत्यूचा प्रश्न गंभीर बनला असून यासाठी …

Read More »

खासदार विनायक राऊत यांनी दिली शिंदे-फडणवीसांना ‘काळू-बाळू’ची उपमा ४० जण गेले म्हणजे शिवसेना संपत नाही

शिवसेनेतील फुटीप्रकरणी उद्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. त्याचबरोबर उध्दव ठाकरे गटाकडून आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. आतापर्यत आदित्य ठाकरे, उध्दव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील सर्वच नेत्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांना गद्दार म्हणून टीका करत होते. मात्र आज शिवसेनेचे कोकणातील खासदार विनायक …

Read More »

पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यालाच राणा दांम्पत्याचा सवाल अजित पवार तेव्हा झोपले होते का?

अमरावती लोकसभा मतदारसंघातील जागे करीता एकदा नव्हे तर दोनदा राष्ट्रवादी काँग्रेसने नवनीत रवि राणा यांना पाठिंबा दिला. त्या पाठिंब्याच्या बळावरच नवनीत कौर या दोन वेळा अमरावतीतून खासदार म्हणून निवडूण आलेल्या आहेत. मात्र त्यांच्या मतदारसंघातील मेळघाट, धारणी या आदीवासी बहुल भागाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी …

Read More »

टिपू सुलतान वादावर असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य,…तर सावरकरांनी माफी मागितली कर्नाटकातील वादावर जाहिर सभेत भाष्य

मागील काही दिवसांपासून म्हैसुर शेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीपू सुलतान यांच्यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर वाद रंगला आहे. त्यातच शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वादही झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी …

Read More »

आता काँग्रेसचे राज्य सरकारच्या विरोधात ‘चिपकू’ आंदोलन आरे मेट्रो कारशेडच्या विरोधात आंदोलन करणार

मेट्रो-३ च्या मार्गिकेसाठी उभारण्यात येणाऱ्या मेट्रो कारशेडचा तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा निर्णय सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने रद्दबातल केला. तसेच मेट्रोचे कारशेड कांजूर मार्ग नव्हे तर आरेतच होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयाच्या विरोधात आज ठाण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, …आता कोणी तुरुंगात जाणार नाही उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली टीका

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरानंतर कोरोनाची भीती असतानाही सर्व सणावरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटविले. त्यातच नुकत्याच झालेल्या दही हंडीच्या उत्सवानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा दांम्पत्याकडून आज दहीहंडीचे आयोजन करत या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव …

Read More »

मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर बसत मंत्री सामंत म्हणाले, आरेचे आंदोलन मागे घ्या दही हंडीला मान्यता दिल्याने भारताचे नाव जागतिक पातळीवर

नॅशनल पार्क १२ हजार हेक्टरवर विस्तारलेला आहे. त्यापैकी आरे कॉलनीची जागा १३०० हेक्टर आहे. त्यातल्या ३० हेक्टर जागेवर मेट्रो तीनचे कारशेड होणार असून या जागेच्या तिन्ही बाजूला रस्ते आहेत. मुळात ही जागा डेअरी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची होती. वनविभागाची नव्हती. परंतु, त्याबाबत सुरवातीपासूनच जाणते- अजाणतेपणी संभ्रम निर्माण केला गेला अशी माहिती उद्योगमंत्री उदय …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्याकडून अॅड गोऱ्हे यांचे कौतुक तर बंडखोरांचा उपाधीनं सन्मान गद्दांरामध्ये निवडणूकीला सामोरे जाण्याची हिम्मत नाही

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गटांकडून एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच या याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवायच्या कि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, फडणवीस कोठेही जाणार नाहीत… पुण्यातून खासदारीसाठी तिकिट द्याच्या मागणीवर व्यक्त केली प्रतिक्रिया

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ब्राम्हण महासंघातील संबध ताणले गेल्याच्या पार्श्वभूमीवर आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्याबद्दल नाराजी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र पाठवित उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी केली. यापार्श्वभूमीवर भाजपाचे …

Read More »

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोदी सरकारला घरचा आहेर, वेळेवर निर्णय घेत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर पहिल्यांदाच गडकरींकडून भाष्य

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे जसे कामाच्या बाबत गतीमान आहेत, तसेच ते बोलण्याच्या बाबतही स्पष्ट असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. कधी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष म्हणून जिवंत राहीला पाहिजे, काँग्रेस सोडू नका, तर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जावून नागरिकांच्या समस्या जाणून घ्या आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न करा असे जाहिर सल्ले …

Read More »