Breaking News

Editor

जगदीप धनखड देशाचे नवे उपराष्ट्रपती निवडणूकीत मार्गारेट अल्वा यांना १८२ मते

पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे आणि एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जगदीप धनखड यांची भारताचे १६ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. उपराष्ट्रपती पदासाठी आज झालेल्या निवडणूकीत त्यांनी युपीएच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. ७२५ मतांपैकी धनखड यांना ५२८ तर अल्वा यांना …

Read More »

बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकशाही राहील की नाही अशी परिस्थिती… पंतप्रधान मोदींच्या ‘घर घर तिरंगा’ला काँग्रेसकडून ‘स्वातंत्र्याचा गौरव’ यात्रेचे उत्तर

मागील काही दिवसांपासून बंद करण्यात आलेली नॅशनल हेराल्ड केस पुन्हा नव्याने ओपन करून ईडीकडून सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. त्यामुळे संपूर्ण देशभरातून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त घर घर तिरंगा अभियानाची घोषणा केली. या अभियानाला प्रत्युत्तर …

Read More »

अजित पवार यांची खोचक टीका, मुख्य सचिवांना अधिकार द्या अन् दोघेबी घरी बसा मग बाकीच्यांनी काय तुमच्या तोंडाकडे बघायचं का?

राज्यात सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. मात्र त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यास सातत्याने उशीर होत आहे. यापार्श्वभूमीवर मंत्र्यांना असलेले काही अधिकार विभागाच्या सचिवांना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या मुद्यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर चांगलाच निशाणा …

Read More »

केसरकरांच्या टीकेला प्रत्युत्तर देतना नितेश राणे म्हणाले, हिंदूत्वासाठी सगळं.. प्रतीक पवार हल्ल्याची चौकशी 'एनआयए'कडे सोपवा-भाजपा आ. नितेश राणे यांची मागणी

नुकतेच एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणावरून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जाणीवपूर्वक शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी आज भाजपाच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत काय उत्तर देणार याकडे लक्ष लागून राहिले …

Read More »

महिलेवरील घृणास्पद अत्याचाराची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल महिला आयपीएस अधिकाऱ्याची एसआयटी करणार फास्ट ट्रॅकवर तपास

गोंदिया जिल्ह्यातील सावरटोली येथील महिलेवर झालेल्या घृणास्पद अत्याचाराची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आयपीएस दर्जाच्या महिला पोलिस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे असून संपूर्ण तपास फास्ट ट्रॅकवर करून आरोपींच्या मुसक्या आवळण्याचे त्याचप्रमाणे यापुढे अशी घटना करावयास कुणी …

Read More »

अब्दुल सत्तार म्हणाले, नरहरी झिरवळांना हटविणार निकालासाठी थांबलो होतो पण आता नाही थांबणार

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थानापन्न झाले. परंतु या दोन्ही नेत्यांचा शपथविधी होवून एक महिना पूर्ण झाला तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. यापार्श्वभूमीवर बंडखोर शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांना विचारले असता ते म्हणाले, न्यायालयाच्या निकालासाठी आम्ही थांबलो होतो. मात्र आता …

Read More »

मेधा सोमय्यांची न्यायालयात मागणी; ईडीला सांगा, राऊतांना जबाब देण्यासाठी हजर करा मानहानी याचिकेवरील सुनावणीवेळी केली मागणी

पत्रावाला चाळ प्रकरणी सध्या ईडी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत हे आज शिवडी न्यायालयात हजर होवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा जबाब घेण्यासाठी ईडीला आदेश देवून त्यांना शिवडी न्यायालयात आणून जबाब घ्यावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली. काही …

Read More »

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, माझ्यासमोरील याचिकांवर निर्णय… पहिल्यांदाच व्यक्त केले मत

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ४० आमदारांनी बंडाचे निशाण उभारले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या गटाने परस्परांच्या विरोधात याचिका दाखल करत सध्या न्यायालयीन लढाई लढत आहेत. सध्या जरी न्यायालयात लढाई सुरु असली तरी विधानसभेत या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या विरोधात याचिका आधीच …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारच्या ‘त्या’ निर्णयामुळे निवडणूकांना आयोगाची स्थगिती राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय कारणीभूत ठरला

राज्यातील रखडलेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली. मात्र नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील जागांबाबत शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय घेतला. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया जाहिर केलेल्या जिल्ह्यांमध्ये पुन्हा स्थगिती देण्याची पाळी राज्य निव़डणूक आयोगावर आली. त्या अनुशंगाने आज स्थगिती आदेश …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, सात गावांसाठी निधी, तर त्या संस्थांना जमिन हस्तांतरीत करा राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरण तातडीने करावी

पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणा-या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात …

Read More »