Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश, सात गावांसाठी निधी, तर त्या संस्थांना जमिन हस्तांतरीत करा राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरण तातडीने करावी

पश्चिम महाराष्ट्रात वारंवार येणा-या आपत्तींचा मुकाबला करण्यासाठी नजीकच्या ठिकाणी राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल असणे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील प्रस्तावित राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी महसूल विभागाने जमिन हस्तांतरणाची प्रक्रिया तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण तालुक्यातील मौजे गोकुळ तर्फ हेळवाक (कोयनानगर) येथे राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. या बैठकीला आमदार शंभूराज देसाई,अपर मुख्य सचिव (महसूल) डॉ.नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता, प्रधानसचिव (वने) वेणूगोपाल रेड्डी, पोलीस महासंचालक रजनीश सेठ,वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, राज्य राखीव पोलीस दलाचे महासंचालक चिरंजीव प्रसाद, उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे, साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अजय कुमार बन्सल,पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,पाटण तालुक्यात कोयनानगर येथे नव्याने राज्य राखीव आपत्ती प्रतिसाद दल व पोलीस प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे त्यानुसार निश्चीत केलेल्या ३९ हेक्टर जमीनीची मागणी पोलीस महासंचालकांनी महसूल विभागाकडे केली आहे त्यानुसार ही जागा पोलीस अधिक्षक सातारा यांच्याकडे वर्ग करण्याबाबत महसूल विभागाने आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी.

पाटण तालुक्यातील भूस्खलन झालेल्या गावांच्या पुनर्वसनासाठी ४ कोटींचा निधी :

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील आंबेघर खालचे,अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुंबरळी, शिद्रुकवाडी, जितकरवाडी (जिंती) या सात गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात पाटण विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या बाधित गावांच्या पुनर्वसनाबाबत आयोजित बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.यावेळी या बैठकीला आमदार शंभूराज देसाई,अपर मुख्य सचिव (महसूल) नितीन करीर, मदत व पुनर्वसन विभागाचे प्रधानसचिव असिम कुमार गुप्ता, वित्त विभागाच्या सचिव श्रीमती ए. शैला, साताराचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,पाटणचे उपविभागीय अधिकारी सुनिल गाडे यासह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालेल्या आंबेघर खालचे अंबेघर वरचे, ढोकावळे, मिरगाव, हुबळी, शिदुकवाडी, जितकरवाडी (निती) या ७ गावांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने खाजगी जमिन खरेदी करण्याकरीता तातडीने कार्यवाही करण्यात यावी या गावामध्ये ५५० घरे नव्याने उभारण्याच्या कामाला गती देण्यात यावी जेणेकरून या गावांचा कायमस्वरूपी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व समन्वयन यंत्रणांनी गतीने काम करावे असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठकीत दिले.

Check Also

तिसऱ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५३ टक्के मतदान

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रासह देशभरात ९४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पाडले. महाराष्ट्रातील ११ मतदारसंघातील मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *