Breaking News

Editor

मुख्यमंत्री शिंदे यांना आता स्पेशल प्रोटोकॉल नको मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलिस महासंचालक, आयुक्तांना निर्देश वाहनचालकांचा खोळंबा नको

राज्यात शिवसेनेत केलेल्या अंतर्गत बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर असलेल्या सर्वच आमदारांपैकी काही जणांना केंद्र सरकारकडून एसपीजी, तर काहींना वाय दर्जाची सुरक्षा पुरविली. ती सुरक्षा व्यवस्था अद्यापही आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे एकनाथ शिंदे यांनाही मुंबईत आल्यानंतर एसपीजीची सुरक्षा पुरविण्यात आली होती. मात्र आता मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर …

Read More »

उध्दव ठाकरे यांचे बंडखोरांना प्रत्युत्तर, बोलत नसलेले तिथे गेल्याने आता बोलू लागले बंडखोरांचे प्रवक्ते दिपक केसरकर, संजय राठोड यांच्या वक्तव्यानंतर टीकास्त्र

इतके दिवस जे गप्प होते ते आता तिथे जाऊन बोलू लागले आहेत. मातोश्रीने सन्मानाने बोलवलं आणि भाजपाशी बोलणी केली तर येऊ असं म्हणत आहेत. मी यापूर्वीही त्यांना सूरतेला जाण्यापेक्षा सूरत (चेहरा) दाखवून इथेच बोलला असतात तर अधिक बरं झालं असतं असं म्हटलं होतं. ते पर्यटन करण्याची काही गरज नव्हती असा …

Read More »

शिंजो आबे यांचे पाच तासानंतर अखेर निधन जाहिर सभेत मारेकऱ्याने गोळ्या झाडल्याने गंभीर जखमी झाले

काही महिन्यापूर्वी दुसऱ्यांदा निवडूण आल्यानंतरही आपल्या आजारपणामुळे जपानच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेले आणि भारताचे मित्र म्हणून ओळखले जाणारे शिंजो आबे यांच्यावर आज भारतीय वेळेप्रमाणे सकाळी ८.३० वाजता प्राणघातक हल्ला झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र पाच तास मृत्यूबरोबरची सुरु असलेली झुंज भारतीय वेळेनुसार दुपारी १.३३ वाजता संपल्याने …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचा निर्णय; मराठवाड्यातील “या” जिल्ह्यांसाठी बोगद्यातून पाणी नेणार पश्चिम वाहिन्या नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा

वैनगंगा – नळगंगा नदी जोड प्रकल्पाबाबतचा आराखडा तयार करा. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांतून वाहून जाणारे पाणी सिंचनासाठी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्न करा त्यासाठी आवश्यक असणारा निधीची तरतूद करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. तसेच यासाठी खास बोगद्याच्या माध्यमातून हे पाणी वळविण्याबाबत विचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री …

Read More »

एकनाथ शिंदे फेम बंड ब्रिटनमध्येही; पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा ४० पेक्षा अधिक मंत्र्यांचे राजीनामे

साधारणत: १२ ते १५ दिवसांपूर्वी महाराष्ट्रात शिवसेनेतील नंबर दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित मंत्र्यांसह  ४० आमदार आणि १० समर्थक आमदारांना घेवून वेगळी चूल मांडली. त्यामुळे राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारला राजीनामा द्यावा लागला. नेमकी काहीसे अशाच प्रकारच्या …

Read More »

उमेश कोल्हे हत्या प्रकरणातील सूत्रधार नवनीत राणा यांचा कार्यकर्ता; पोस्टवरून उघड नवं वळण लागण्याची शक्यता

मुस्लिम समुदायाचे श्रध्दास्थान असलेल्या महम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या भाजपा प्रवक्त्या नूपूर शर्मा हिच्या समर्थनार्थ पोस्ट समाज माध्यमात फॉरवर्ड केल्यामुळे आपल्या प्राणास मुकावे लागलेल्या उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार इरफान खान हा भाजपा समर्थक खासदार नवनीत राणा यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला …

Read More »

मविआच्या काळातील ‘हा’ प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या मदतीने शिंदे सरकार राज्यात राबविणार बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन करा- मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

तत्कालीन महाविकास आघाडी अर्थात मविआ सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प पुर्ण होण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. अखेर राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेत प्रकल्पाला गतिमान …

Read More »

मुंबई – गोवा महामार्गावरील परशुराम घाट वाहतुकीकरिता बंद मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे १० जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टी तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. मंत्रालय नियंत्रण कक्ष सतर्क असून राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या संपर्कात आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दरड …

Read More »

उध्दव ठाकरेंवरील ‘त्या’ टीकेवर राऊत म्हणाले, शिंदेंच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल ट्विट तरी करता येत का ? खोचक सवाल

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील भाषणावर टीका केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर पलटवार करताना रिक्षाच्या वेगाने मर्सिडीजला मागे टाकले असा खोचक टोला लगावला होता. या टीकेबाबत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. …

Read More »

शिवसेनेला ठाण्यानंतर आता नवी मुंबईतही धक्का: एक नगरसेविका मात्र विरोधात ठाणे महापालिकेतील ६६ तर नवी मुंबईतील ३०-३२ जण शिंदे गटात जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत सेनेतील ४० आमदारांना घेवून स्वतंत्र चूल मांडत मुख्यमंत्री पदाची शपथ घेत भाजपाच्या मदतीने राज्यात सरकारही स्थापन केले. या बंडाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर पडत असून एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेतील ६७ …

Read More »