Breaking News

Editor

नाशिक-मालेगावच्या नगरसेवकांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेत व्यक्त केला ‘हा’ निर्धार ४० नगरसेवक उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेच्या विरोधात बंड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकल्यानंतर अनेक आजी-माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात जात आहेत. मात्र नाशिक आणि मालेगांव येथील नगरसेवकांनी मात्र शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेत आज मातोश्री येथील निवासस्थानी ठाकरे …

Read More »

मुलीवरील ‘त्या’ आरोपावरून स्मृती इराणी यांची काँग्रेस नेत्यांना नोटीस आरोप मागे घ्या लेखी माफी मागा

मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या मुलीवर गोव्यात अवैध मद्यालय आणि बीफ आणि पोर्क मासांचे जेवण त्यांच्या हॉटेलच्या ग्राहकांना देण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. आता या आरोपानंतर स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नीता डिसुजा …

Read More »

अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर एसटी अपघात; मुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेत दिले ‘हे’ निर्देश ३५ प्रवासी जखमी, जखमींना ५० हजाराची मदत जाहीर

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून पुण्याला येणाऱ्या राज्याच्या एसटी बसचा अपघात होवून १३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच आज सोलापूर जिल्ह्यात आणखी एक एसटी बसला अपघात झाला. मात्र सुर्देवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र ३५ प्रवासी जखमी झाले. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला …

Read More »

१९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटीक्समध्ये नीरज चोप्राने जिंकले पहिले रौप्य पदक पहिल्याच प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भाला फेकला

भारताचा नामांकित भालाफेक पटू नीरज चोप्राने तब्बल १९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भारताच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सध्या युजीनमध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा याने भाग घेतला. त्यात त्याने पहिल्याच रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी अंजू बेबी जॉर्ज हिने लांब …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपाची पहिलीच प्रदेश कार्यकारणीची बैठक पनवेल येथे पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरले …

Read More »

ब्राह्मण महासंघाचा सवाल; नेमके शरद पवार कोणते? १९७४ चे की कालचे… शिवशाहीर बा.म.पुरंदरे यांच्यावरील टीकेनंतर आनंद दवे यांचा सवाल

शिवचरित्र लिहीण्यावरून आणि त्यातील एकांगी लेखनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शिवशाहिर बाबासाहेब म. पुरंदरे यांच्यावर टीकेची झोड उठवित धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नसल्याचे वक्तव्य केले. तसेच, शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव यांचे योगदान काय? …

Read More »

मंगळवारी २६ जुलै रोजी मुंबईसह राज्यभरात काँग्रेसचा ‘सत्याग्रह’ सोनियाजी गांधींना चौकशीच्या नावाखाली हुकूमशाही मोदी सरकारकडून नाहक त्रास !: नाना पटोले

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधकांना संपवण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणांचा वारेमाप दुरुपयोग करत आहे. मोदी सरकारच्या या दहपशाहीला काँग्रेस पक्ष भीक घालत नाही. सोनियाजी गांधी आजारी असून वयाच्या ७० व्या वर्षी त्यांना चौकशीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात आहे. मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात काँग्रेस पक्ष मंगळवार २६ जुलै रोजी पुन्हा …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा: २ वर्षात मुंबई होणार रस्ते खड्डेमुक्त, सिमेंटचे रस्ते सध्या २३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरु तर ४०० किलोमीटरची कामे प्रस्तावित

मुंबई महानगरात चांगल्या प्रतीचे रस्ते बांधण्यासाठी होत असलेली कामे आणि रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण करून होत असलेल्या सुधारीत रस्त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केल्या. मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणाला …

Read More »

सरन्यायाधीश रमण्णा म्हणाले, मलाही सक्रिय राजकारणात यायचं होतं पण… झारखंड उच्च न्यायालयाच्या कार्यक्रमात दिली कबुली

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा हे आपल्या धीरगंभीर आणि विद्धवतापूर्ण न्यायालयाच्या निकालामुळे त्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे गांभीर्याने पाहिले जाते. मात्र त्यांनी आपलं जीवनात काय करायचे होते याची आठवण सांगत सक्रिय राजकारणाचे आकर्षण त्यांनाही तरूण पणात होते याची स्पष्टोक्ती त्यांनी दिली. झारंखड उच्च न्यायालयाच्या आज झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, हिंदुत्व विचारासाठी सत्ता परिवर्तन, पण… भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत प्रतिपादन

हिंदुत्व विचाराच्या रक्षणासाठी राज्यात सत्ता परिवर्तन झाले असून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार भाजपा बरोबर आले आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पनवेल येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोप प्रसंगी करत ते पुढे म्हणाले, जरी सरकार राज्यात आलेले असले तरी सर्वांच्याच अपेक्षा पूर्ण होतील असे नाही. अनेकांना …

Read More »