Breaking News

अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर एसटी अपघात; मुख्यमंत्री शिंदेंनी दखल घेत दिले ‘हे’ निर्देश ३५ प्रवासी जखमी, जखमींना ५० हजाराची मदत जाहीर

काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातून पुण्याला येणाऱ्या राज्याच्या एसटी बसचा अपघात होवून १३ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना ताजी असतानाच आज सोलापूर जिल्ह्यात आणखी एक एसटी बसला अपघात झाला. मात्र सुर्देवाने या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र ३५ प्रवासी जखमी झाले.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला झालेल्या भीषण अपघातात ३५ प्रवासी जखमी झाले. या अपघातातील जखमी प्रवाशांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अक्कलकोट येथील रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांनादेखील पाचरण करण्यात आले. सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही.

या अपघाताची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी तातडीने सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून निर्देश दिले. अपघातातील जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट किंवा जवळपासच्या रुग्णालयांत हलवून योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. मुख्यमंत्र्यांनी एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली व जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.

त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे, अशा ठराविक किंवा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५० हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

तसेच फोनवरून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जखमी प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *