Breaking News

१९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटीक्समध्ये नीरज चोप्राने जिंकले पहिले रौप्य पदक पहिल्याच प्रयत्नात ८८.१३ मीटर लांब भाला फेकला

भारताचा नामांकित भालाफेक पटू नीरज चोप्राने तब्बल १९ वर्षानंतर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई करत भारताच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा खोवला. सध्या युजीनमध्ये जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत नीरज चोप्रा याने भाग घेतला. त्यात त्याने पहिल्याच रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी अंजू बेबी जॉर्ज हिने लांब उडीत अॅथलेटिक्समध्ये कांस्य पदक जिंकले होते.

नीरज चोप्राने ८८.१३ मीटर भालाफेक करत रौप्यपदक आपल्या नावावर केलं. जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत अंजू बेबी जॉर्ज हीने कांस्यपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्रा पदक जिंकणारा दुसरा भारतीय आणि पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९०.५४ मीटर अंतरावर भाला फेकत सुवर्णपदक जिंकले.

युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं होतं. दरम्यान, रविवारी पार पडलेल्या अंतिम फेरीत चौथ्या प्रयत्नात नीरज चोप्राने ८८.१३ मीटर अंतरावर भाला फेकला आणि रौप्यपदक आपल्या नावे केलं. २४ वर्षीय नीरजने अग्रस्थान मिळवल्यास ऑलिम्पिक विजेतेपदापाठोपाठ जगज्जेतेपद पटकावणारा तो तिसरा भालाफेकपटू ठरला असता.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ‘रुपेरी’ कामगिरी केल्यानंतर नीरज चोप्रानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. मी स्पर्धेतील निकालावर समाधानी असून देशासाठी पदक जिंकल्याचा आनंद आहे. तसेच पुढच्या जागतिक स्पर्धेत यापेक्षा उत्तम कामगिरी करू, असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.

रौप्य पदक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना नीरज चोप्रा म्हणाला, हवामान अनुकूल नसताना आणि वाऱ्याचा वेग खूप जास्त असताना, मी चांगली कामगिरी करेन, याची मला खात्री होती. मी निकालावर समाधानी आहे. माझ्या देशासाठी पदक जिंकू शकलो, याचा मला आनंद आहे.

पुढच्या वर्षी होणाऱ्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये मी अधिक चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. मला पाठिंबा दिल्याबद्दल आणि परदेशात सरावासाठी परवानगी दिल्याबद्दल मी SAI, TOPS, अॅथलेटिक्स फेडरेशन आणि भारत सरकारचे आभार मानतो. मला आशा आहे की इतर खेळांनादेखील असाच पाठिंबा मिळेल, जेणेकरून आम्ही भारत देशाची मान अभिमानाने उंचावू असा विश्वासही त्यांने यावेळी व्यक्त केला.

Check Also

लोकसभा निवडणुकीसाठी दिव्यांग कर्मचारी करणार २५४ मतदान केंद्रांचे नियंत्रण

येत्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात दिव्यांग कर्मचारी नियंत्रित मतदान केंद्रे असणार आहेत. राज्यभरात एकूण २५४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *