Breaking News

मविआच्या काळातील ‘हा’ प्रकल्प वर्ल्ड बँकेच्या मदतीने शिंदे सरकार राज्यात राबविणार बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन करा- मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश

तत्कालीन महाविकास आघाडी अर्थात मविआ सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन हा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. मात्र कोरोनामुळे हा प्रकल्प पुर्ण होण्याच्यादृष्टीने कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. अखेर राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने आज जागतिक बँकेच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत बैठक घेत प्रकल्पाला गतिमान करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्वपूर्ण ठरणारा आहे. त्यामुळे या स्मार्ट प्रकल्पाला गती द्यावी, त्यासाठी कालबद्ध नियोजन करण्यात यावे, असे निर्देश दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपरमुख्य सचिव आशिषकुमार सिंह, वित्त विभागाचे अपरमुख्य सचिव मनोज सौनिक, ग्रामविकास विभागाचे अपरमुख्य सचिव राजेशकुमार, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव विकास खारगे, कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी विभागाचे आयुक्त धीरज कुमार उपस्थित होते. तसेच दृकश्राव्य प्रणालीद्वारे जागतिक बँकेचे प्रतिनिधी तसेच आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सहभागी होते.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक मनुष्यळबळ तसेच निधीची कमतरता भासू देणार नाही. यासाठी सर्व त्या प्रकारचे पाठबळ दिले जाईल. ग्रामीण स्तरावर कार्यरत विविध यंत्रणाशी समन्वय ठेवून हा प्रकल्प राबविण्यात यावा. जागतिक बँकेने सहकार्य देऊ केलेला हा प्रकल्प आहे. या बँकेचा विश्वास वाढेल, अशा पद्धतीने प्रकल्पाला गती देण्यात यावी. प्रकल्प राज्यभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविल्यामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची सर्वांगीण प्रगती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात यावा. या प्रकल्पाला शासनस्तरावरून आवश्यक असणारी सर्व मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी उपस्थित मान्यवरांना प्रकल्पाची माहिती दिली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *