आज उत्तर भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राज्यामध्ये मकर संक्रांती तर पंजाब, हरयाणा, चंदिगढ आदी राज्यांमध्ये लाहोरी तर दक्षिण भारतात पोंगुल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पोंगुल या सणाची उत्साहात साजरा करण्यात आला. हा सण वास्तविक पाहता शेतकऱ्यांचा सण म्हणून साजरा केला जातो. या दिवसापासून शेती चक्रकालातील नव्या ऋतुला सुरुवात होते. या दिवशी शेतकरी आपल्या शेतजमीने दिलेल्या साथीबद्दल तिचे यथोचित पूजा करतो. तसेच शेतीशी निगडीत पिकाची पुजाही करतो. या दिवसानिमित्त शेतकरी विविध अशा पाच मिक्स पालेभाज्याची भाजी तयार करून शेतजमिनीला नैवैद्य दाखवून आपल्या दिनचर्येची सुरुवात केली जाते. तसेच शहरी भागात राहणारे शेतकरीही गावी जाऊन आधी शेतजमीनीची पूजा करतात.
महाराष्ट्रात मकरसंक्रातीच्या उत्सवानिमित्त तीळ गुळ देत एकमेकांला शुभेच्छा दिल्या जातात. तसेच मकरसंक्रातीपासून थंडीचा अर्थात हिवाळा ऋतुतील थंडी ओसरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तसेच याच काळात शेतीतील ज्वारी पिकाचीही वाढ होण्यास सुरुवात होते. त्यामुळे या काळात ग्रामीण भागात उरडा खाण्यासाठी जवळच्या नातेवाईकांना आमंत्रित करण्यात येते.
तर मुंबई आणि गुजरातमध्ये मकार संक्राती सणाच्या निमित्ताने मोठ्या प्रमामावर पंतग उडविण्याचा आनंद साजरा केला जातो. तर पंजाब, दिल्ली, चंदिगढ, हरयाणा आदी राज्यात गावोगावच्या जत्रा आयोजित करत पारंपारीक पध्दीने शेतजमिनीसह सुर्याला नैवेद्य देत नव्या ऋतुचे स्वागत केले जाते.
दक्षिण भारतात मकर संक्रातीचा सण हा पोंगुल या नावाने साजरा केला जातो. मात्र दक्षिण भारतात पोंगुल सणादिवशी शेतजमिनीसह शेती व्यवसायाशी संबधित सर्व गोष्टींची पूजा केली जाते.
दरम्यान, सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या सिद्धेश्वराच्या यात्रेस सुरुवात होते. मकर संक्रातीच्या निमित्ताने येथील विविध समाजाच्या हबुच्या उंचच उंच काठ्यांची दोन दिवसांपासून सुरु असलेली मिरवणून मकरसंक्रातीच्या दिवशी सिद्धेश्वर मंदिरात पोहोचते. त्यानंतर सिद्धेश्वराची विधीवत पूजा केली जाते. तसेच पूजे दरम्यान सिद्धेवराच्या मुर्तीवर अक्षताही टाकल्या जातात. तसेच या पूजेनिमित्त आगामी वर्ष शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कसे असेल याचे भाकितही केले जाते.
एका गायीच्या पिलाला दिवसभर उपाशी ठेवले जाते. संध्याकाळी भाकितावेळी आणि सिद्धेश्वराच्या पुजेची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या गाईच्या पिलासमोर शेत पीकांचे धान्य आणि पिण्यासाठी पाणी ठेवले जाते. सर्वप्रथम त्या पिलाने जर धान्याला तोंड लावले तर पीक, डाळी, धान्य आदी गोष्टी महाग होणार असल्याचे भाकित वर्तविले जाते. आणि जर त्या पिलाने पाणी प्यायल्यानंतर फक्त लघवी केली तर पाऊस जास्त पडणार आणि लघवीबरोबर शेण बाहेर टाकल्याने प्रमाणापेक्षा पीक-पाणी चांगले होणार असे भाकित वर्तविले जाते. हे भाकित सिद्धेश्वर मंदिराच्या पुजाऱ्याकडून केले जाते.