Breaking News

अवकाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २१०९ कोटींचा निधी वितरणास मान्यता

गेल्या वर्षी नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी  दोन हजार एकशे नऊ कोटी बारा लाख दोन हजार इतका निधी वितरीत करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

  अतिवृष्टीपूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेत पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Input subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेचराज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते.  मात्र नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानाकरिता सुधारित दराने २ ऐवजी ३ हेक्टरपर्यंत मदत देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात मदतीची घोषणा केली होती.

नोव्हेंबर व डिसेंबर २०२३ या महिन्यात अवेळी पाऊसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानासाठी विभागीय आयुक्तनागपूरकोकणअमरावतीपुणे व छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून मदतीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. या शेतकऱ्यांना मदत व  दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने निधी वितरित करण्यास मान्यता दिली आहे.  तसेच यापूर्वी १० जानेवारी रोजी नाशिक विभागाकरिता १४४ कोटी निधी वितरणास मान्यता दिली असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

 

 

नोव्हेंबर व डिसेंबर202मध्ये शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता वितरित करावयाच्या निधीचा तपशिल

अ. क्र.

जिल्हा

 बाधित क्षेत्र – हेक्टर

बाधित शेतकरी संख्या

निधी (रु. लक्ष)

1

गोंदिया

12244.12

28242

2054.49

एकूण

12244.12

28242

2054.49

विभागीय आयुक्तनागपूर यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव

1

नागपूर

13479.93

17936

3268.39

2

वर्धा

8.40

17

1.23

3

भंडारा

8607.93

20821

2318.75

4

गोंदिया

13417.96

25054

3620.88

5

चंद्रपूर

19694.04

39688

2678.38

एकूण

55208.26

103516

11887.63

विभागीय आयुक्तकोकण यांचा दि.23.01.2024 चा प्रस्ताव

1

ठाणे

157.72

726

33.40

2

पालघर

1677.67

7397

260.05

3

रायगड

1191.23

4560

163.04

4

रत्नागिरी

87.92

365

11.96

5

सिंदूधुर्ग

114.14

635

16.64

एकूण

3228.68

13683.00

485.09

विभागीय आयुक्तअमरावती यांचा दि.20.01.2024 चा प्रस्ताव

1

अमरावती

206265.86

322944

35795.46

2

अकोला

189681.68

246188

33296.96

3

यवतमाळ

36545.00

84451

6935.25

4

बुलढाणा

157180.90

276575

22034.77

5

वाशिम

60250.95

203857

11526.63

एकूण

649924.39

1134015

109589.07

विभागीय आयुक्तपुणे यांचा दि.17.1.2024 चा प्रस्ताव

1

पुणे

7863.91

19727

1815.96

2`

सातारा

80.63

182

25.64

3

सांगली

16277.89

31549

5811.23

4

सोलापूर

30660.92

41458

8248.17

5

कोल्हापूर

16.18

71

2.33

एकूण

54899.53

92987

15903.33

विभागीय आयुक्तछत्रपती संभाजीनगर यांचा दि.20.1.2024 चा प्रस्ताव

1

छत्रपती संभाजीनगर

148368.41

264194

20600.58

2

जालना

123091.87

207216

19176.93

3

परभणी

95053.67

231787

13080.59

4

हिंगोली

123164.40

257625

16786.65

5

नांदेड

3758.50

3922

880.26

6

बीड

9.90

17

2.19

7

लातूर

262.89

888

35.91

8

धाराशिव

1208.66

1912

429.30

एकूण

494918.30

967561

70992.41

एकूण राज्य

1270423.28

2340004

210912.02

 

Check Also

नाचणीचे आहे, आहारात महत्व

यंदाचे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. यंदाच्या वर्षातील प्रत्येक महिना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *