मागील महिन्यात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर ३१ जानेवारीपर्यंतच प्रथम दर्जाच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जानेवारी महिन्याच्या सुरुवातीपासून मंत्रालयात विविध जिल्ह्याचे पोलिस आयुक्त आणि तर मंत्रालयासह अनेक विभागाचे प्रधान सचिव असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांनी मंत्रायलासह विभागीय आयुक्त पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली.
पुढील दोन महिन्यात केव्हाही लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू शकते. त्यामुळे प्रथम दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नियमित बदल्या मार्च-एप्रिल-मे या कालावधीत करण्याऐवजी ३१ जानेवारी २०२४ पूर्वी कराव्यात असे स्पष्ट निर्देशही केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते. त्या पार्श्वभूमीवर आज १७ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची यादी राज्य सरकारने जाहिर केली. तर गृहविभागाकडून ४४ आयपीएस आणि प्रथम दर्जाच्या पोलिसांच्या बदल्यांची यादी जाहिर करण्यात आली.
आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या खालीलप्रमाणेः-
संजय यादव यांना मुंबईचे जिल्हाधिकारी तर राजेंद्र क्षिरसागर यांना मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नितीन पाटिल यांच्याकडे राज्य मानवाधिकार आयोगाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अभय महाजन यांच्याकडे महाराष्ट्रातील जीएसटीचे विशेष आयुक्त म्हणून आज नियुक्ती करण्यात आली.
कोल्हापुर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे शिक्षा आणि संशोधनचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी ही जबाबदारी अमोल येडगे यांच्याकडे होती.
अमोल येडगे यांच्याकडे कोल्हापूर जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. को कोल्हापुर का कलेक्टर नियुक्त किया गया है।
मनुज जिंदल यांच्याकडील ठाणे जिल्हा परिषदेहून महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाच्या सह व्यवस्थापकिय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच भाग्यश्री विसपुते यांच्याकडे संभाजीनगरच्या सिडकोच्या मुख्य व्यवस्थापक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अविशांत पांडा यांची बदली नागपुर येथील वस्त्रोद्योग विभागाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वैभव वाघमारे यंची वाशिम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय मोहपात्रा यांच्याकडे अमरावती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मंदार पत्की यांची तर मकरंद देशमुख यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्त करण्यात आले आहे.
नतीशा माथुर यांच्याकडे नंदूरबारच्या आदिवासी विकास प्रकल्पाच्या संचालक पदासह तळोदाच्या सहजिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मानसी यांच्या चंद्रपुरच्या सहजिल्हाधिकारी पदी नियुक्त करण्यात आले आहे.
पुलकित सिंह यांच्याकडे नाशिकचे सहजिल्हाधिकारी पदी आणि करिश्मा नायर यांच्याकडे आदिवासी प्रकल्प योजनेच्या संचालक पदासह सहजिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश खालीलप्रमाणे