Breaking News

हेमंत सोरेन यांचा राजीनामा, तर चंम्पाई सोरेन नवे विधिमंडळ गटनेते

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचा पॅटर्न झारखंड राज्यातही राबवित झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात आले. मात्र मागील काही दिवसांपासून सातत्याने कथित कोळसाखाण घोटाळ्याप्रकरणी हेमंत सोरेन यांची ईडीकडून सातत्याने चौकशी सुरु होती. तसेच आजही ईडी अधिकाऱ्यांनी सात तास चौकशी केली. त्यानंतर अखेर हेमंत सोरेन यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी राजभवनावर नेत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर ट्रान्सपोर्ट मंत्री चंम्पाई सोरेन यांची लगेच झारखंडच्या विधिमंडळ गटाच्या नेते पदी नाव जाहिर करण्यात आले.

झारखंड मध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाने पाठिंबा दिला आहे. परंतु लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर ईडीकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कारवाईचा फास आळवण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाच्या राज्यसभा खासदार महुआ माझी यांनी सांगितले की हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांची रवानगी ईडी कोठडीत करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या पुढील विधिमंडळ गटनेते पदी चंम्पाई सोरेन यांचे नाव पक्षाकडून निश्चित करण्यात आले आहे.

Check Also

राहुल गांधी यांचा थेट सवाल, मोदीजी घाबरलात का?

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झालेली आहे. त्यातच पुन्हा एकदा भाजपा आणि नरेंद्र मोदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *