Breaking News

Editor

साखर उत्पादनात महाराष्ट्र ठरला जगात तिसरा

राज्याचा यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. यंदा उसाचे क्षेत्र वाढले असून साखर उत्पादनात महाराष्ट्र जगात तिसरा असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषीमंत्री अब्दुल …

Read More »

छात्र भारतीचे आव्हान: अनिल बोंडेंच्या घरासमोर आंतरधर्मीय विवाह लावणार छात्र भारतीचे राज्यध्यक्ष रोहित ढाले यांची घोषणा

भाजपाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी आंतरधर्मीय विवाहाविरोधात खाजगी विधेयक मांडणार असल्याचे मत व्यक्त केले. सर्वच आंतरधर्मीय विवाह हे फसवून, धमकावून होत नाहीत हे ठणकावून सांगण्यासाठी येणाऱ्या काळात अनिल बोंडे यांच्या घरासामोरच छात्रभारती आंतरधर्मीय विवाह लावून देणार असल्याचे छात्रभारतीचे राज्याध्यक्ष रोहित ढाले यांनी सांगितले. मुलींना प्रलोभने देऊन, गिफ्ट देऊन धमक्या …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, जनमताचा कौल सध्याच्या सत्ताधाऱ्यांविरोधात अन..

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी मराठवाडा विभागाच्या दौऱ्यावर असून त्यांनी अहमदनगर व औरंगाबाद येथे शहर व ग्रामीण संघटनेचा आढावा घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांकडून पक्ष वाढीसंदर्भात त्यांच्या संकल्पना जाणून घेतल्या. मागील काळात आपल्या या जिल्ह्यांनी मोठ्या प्रमाणावर पवारसाहेबांना ताकद दिली …

Read More »

भाजपा म्हणते, शिवसेनेबाबत एकनाथ शिंदे यांची भीती खरी ठरली मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांचे वक्तव्य

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला राज्यभरात अभुतपूर्व यश मिळाले आहे. भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो. जनतेची सेवा आणखी दुप्पट वेगाने करु, असा विश्वास व्यक्त करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्व. …

Read More »

आंदोलनकर्त्या दुर्गप्रेमींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री थेट आझाद मैदानावर

गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धनाबाबत राज्यभरातील दुर्गप्रेमी तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केल. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आझाद मैदान गाठले. आंदोलकर्त्यांची भेट घेतली. गड किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. राज्याच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणाऱ्या गड किल्ल्यांचे …

Read More »

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारणार निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली. रायगड जिल्ह्यातील …

Read More »

उध्दव ठाकरे यांच्या टीकेवरून नारायण राणे यांनी साधला निशाणा, मला फोन करावा मी सांगतो काँग्रेसच्या खुलाशावर मात्र साधली चुप्पी

आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत नामिबियातून भारतातून आणण्यात आलेले ८ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या हाताने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. यानिमित्ताने तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदी यांचा हा प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधत …

Read More »

मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांची निती आयोगाला ग्वाही, १ ट्रिलीयनची अर्थव्यवस्था करणार महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था

महाराष्ट्रात विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तनासाठी निती आयोगाच्या धर्तीवर राज्यस्तरीय संस्था स्थापना होत असून त्यामाध्यमातून कृषी, आरोग्य, शिक्षण रोजगार, पर्यावरण या विषयावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. प्रत्येक क्षेत्रात सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून त्यासाठी निती आयोगाने राज्याला सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच देशाच्या पाच ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी …

Read More »

नारायण राणे म्हणाले, त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही काँग्रेस, शिवसेनेला दिला इशारा

फडणवीस सरकारच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाणार येथील रिफायनरीला विरोध केला. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारल्यानंतर रिफायनरीचा प्रकल्प नाणारऐवजी बारसू गावात करण्याची तयारी दर्शविली. त्यातच आता या प्रकल्पावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कोकणचा दौरा करत स्थानिक नागरिकांची मते जाणून घेतली. त्यानंतर या रिफायनरी प्रकल्पाला …

Read More »

तैवानमध्ये २४ तासात तीनवेळा भूकंप जपानला त्सुनामीचा इशारा

तैवानमध्ये गेल्या २४ तासात तीन वेळा भूकंप आला आहे. भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पूर्व भागातील तायतुंग काऊंटी भूकंपाचं मुख्य केंद्र आहे, शनिवारी याच भागात ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, रविवारी सकाळी ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप जाणवला. …

Read More »