Breaking News

Editor

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ म्हणणार्‍या मोदींच्या रेल्वे मंत्रालयात चार लाख डॉलरची लाच

‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरॅकल कंपनीने दिल्याप्रकरणी २३ मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज …

Read More »

डॉ श्रीकांत शिंदे यांचे उध्दव ठाकरे यांना खुले पत्र, हे तुमच्या धगधगत्या हिंदूत्वात बसतं का? पापाचे धनी होवू नका अशी कळकळीची विनंती

दसरा दिनाचे औचित्य साधत आपलीच शिवसेना खरी असल्याचे दाखविण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्यावतीने दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिवाजी पार्क येथे झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांचे दिड वर्षाचे चिरंजीव रूद्रांश याच्यावरही टीका केली. …

Read More »

नाना पटोले यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र, जनतेच्या बँक खात्यात ‘दिवाळी भेट’ जमा करा

राज्य मंत्रिमंडळाने रेशनकार्ड धारकांना दिवाळीसाठी १०० रुपयामध्ये रेशन दुकानातून एक किलो चणाडाळ, साखर, रवा व एक लिटर पामतेल देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारची ही दिवाळी भेट अत्यंत तुटपुंजी आहे. सरकारने महागाईचा विचार करून प्रत्येक कुटुंबाच्या बँक खात्यातच तीन हजार रुपये दिवाळी भेट जमा करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना सेंद्रिय शेतीला लोकचळवळीचे स्वरूप देणार

महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत असुन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली. नवी दिल्ली येथे आयोजित या …

Read More »

नाना पटोले यांचा टोला, काँग्रेसला दोष देऊन एकनाथ शिंदेंना गद्दारीचे पाप लपवता येणार नाही बीकेसीवरील मेळाव्यात एकनाथ शिंदेंनी वाचली भाजपाची स्क्रिप्ट

मुंबईतील बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे गटाच्या मेळाव्याला राज्यातील विविध भागातून सामान्य जनतेला खोटी माहिती देऊन भाडोत्री गर्दी जमवण्यात आली होती परंतु या जनतेने शिंदेंचे भाषण न ऐकताच काढता पाय घेतला. राज्याचा मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाच्या हातचे बाहुले असल्याचे राज्यातील जनतेने काल पाहिले. एकनाथ शिंदे यांनी आपल्या गद्दारीचे समर्थन करत …

Read More »

बीकेसीत शिंदेंच्या समर्थनार्थ ठाकरे कुटुंबिय, जयदेव ठाकरे म्हणाले, एकटे सोडू नका एकनाथ शिंदे याचे चार-पाच निर्णय आपल्याला आवडले

खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ५ सप्टेंबर रोजी शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले सुपुत्र जयदेव ठाकरे यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही गद्दारी नाही तर गदर केलाय पण गद्दारी झाली… शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर

आम्ही गद्दारी केली नाही, तर गदर केलाय. गदर म्हणजे क्रांती. आम्ही गद्दार नाही, तर बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. ते आम्ही अभिमानाने छाती ठोकपणे सांगू शकतो. तुम्ही तर त्यांचे विचार विकले. आम्हाला म्हणता बाप चोरणारी टोळी निर्माण झालीय. अरे तुम्ही तर बापाचे विचार विकले, तुम्ही बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. आम्ही तुम्हाला ती …

Read More »

उध्दव ठाकरेंचे खुले आव्हान: हिंदूत्वावरून होऊनच जाऊ द्या, या एका व्यासपीठावर शिंदे गटासह भाजपालाही दिले आव्हान

माझी शस्त्रक्रिया झाला. माझी बोटंही हालत नव्हती. त्यावेळी ज्यांच्यावर जबाबदारी सोपविली. त्यांनीच गद्दारी करत पाठीत खंजीर खुपसला आणि ज्यांच्यावर लक्ष ठेवत होतो. त्यांनी मात्र सोबत केली. मी काँग्रेस, राष्ट्रीवादीसोबत आघाडी केली म्हणून मला हिंदूत्व सोडलं म्हणता. या एकदा हिंदूत्वावरून होवूनच जाऊ द्या तुम्ही सगळे जण एका व्यासपीठावर या असे खुले …

Read More »

‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमाची सुरुवात उद्यापासून सुरुवात : मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा नागरिकांच्या समस्या आणि तक्रारी-सूचना जाणून घेण्यासाठी ६ ऑक्टोबर ते ४ नोव्हेबर पर्यंत ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ हा उपक्रम राबवणार आहेत. या उपक्रमाची उद्या, गुरुवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी  ‘एन वॉर्ड’ मधून सुरुवात होणार आहे. या उपक्रमात  जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री मंगल प्रभात …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, माझ्या मात्या-पित्याची शपथ घेवून सांगतो ते तसंच आहे अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्यासह बंडखोरांवर सोडले टीकास्त्र

काही दिवसांपूर्वी अमित शाह आले होते. ते म्हणाले आम्हाला जमिन दाखवायची आहे. मी तर म्हणतो खरेच दाखवाच आम्हाला जमिन. आम्ही जमिनीवरचेच आहोत. या इथे बघा असे सांगत अमित शाह म्हणतात तसे काही ठरले नव्हते. मी माझ्या मात्या-पित्याची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मी जे सांगतोय ते तसेच …

Read More »