Breaking News

जागतिक दर्जाचा इको पार्क उभारणार निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

पर्यावरण संरक्षण आणि संतुलन हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. या संदर्भात राज्याचा वन विभाग सतर्क असून निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून लोकजागृती करण्याच्या दृष्टीने जागतिक दर्जाचे नैसर्गिक उद्यान अर्थात इको पार्क उभारता येईल का याविषयी राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज वन विभागाचे प्रधान सचिव व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात वन जमिनीवर इको पार्क तयार करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे आज बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, निसर्ग पर्यटन महामंडळाचे व्यवस्थपकिय संचालक विकास गुप्ता, निखिल गांधी यांच्यासह उपस्थित होते.

मुनगंटीवार म्हणाले, वाढते प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरण संतुलन ही सामाजिक जबाबदारी आहे असे समजून काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यात विपुल वनसंपदा असून या माध्यमातून काही नविनतम लोकोपयोगी प्रयोग करता येतील का असा सतत विचार मनात येतो , त्यातूनच ही इको पार्क ची संकल्पना असून वन कायदा, अधिकार आणि इतर सर्व नियमांची शहनिशा करुन, आवश्यक ती पूर्तता करुन जागतिक दर्जाचा इको पार्क महाराष्ट्रात व्हावा यासाठी प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रसंगी जगातील सर्वोत्तम तंत्रज्ञान, याविषयातील अनुभवी तज्ञ यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल.

मुंबई हे जागतिक आकर्षणाचे केंद्र आहे. पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई आणि परिसरातील विविध ऐतिहासिक आणि प्रेक्षणीय स्थळे विकसित करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने काम करण्याची इच्छा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

  गडकिल्ल्यांच्या सुशोभीकरणासाठी जेजे कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा विचार

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनात सुशोभीकरण हा एक महत्त्वाचामुद्दा असून याबाबत जेजे कला महाविद्यालयाची मदत घेण्याचा शासन विचार करत असल्याचे आज सांस्कृतिक मंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात आज जे.जे. कला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री राजीव मिश्रा यांनी मुनगंटीवार यांची सदिच्छा भेट घेतली.

सिंहगड किल्ल्याच्या सुशोभीकरणात जे.जे. कला महाविद्यालयाचा सहभाग घेण्यावर यावेळी चर्चा झाली. तसेच कांदळवनांच्या कुंपणभींतींचे सुशोभीकरणही जे.जे. कला महाविद्यालयाने करण्याबद्दलही यावेळी चर्चा झाली. सांस्कृतिक खात्याच्या कार्यक्रमांत जे.जे. कला महाविद्यालयाचा कसा सहभाग असू शकतो यासंदर्भातही यावेळी चर्चा केली.

महाराजांवर चित्रपट निर्मितीची आवश्यकता

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर एक चांगला चित्रपट निर्माण होणे आवश्यक आहे असे सांस्कृतिक कार्य  मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे आज विविध कलाकारांची सदिच्छा भेट घेतली. अभिनेत्री अलका कुबल यांच्याशी चर्चा करताना मुनगंटीवार म्हणाले, हा चित्रपट माहितीने अचुक होण्यासाठी तसेच दर्जाने उत्तम होण्यासाठी राज्य शासन योग्य ती मदत करेल पुढच्या वर्षी १४ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 कलाकारांच्या विविध समस्यांसदर्भात  मार्ग काढू

राज्यातील कलाक्षेत्रात कार्यरत कलाकारांना विविध समस्या भेडसावत असून शासन त्यावर वेगाने मार्ग काढेल असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

सह्याद्री अतिथीगृहात आज ज्येष्ठ कलाकार वैजयंती कुलकर्णी आपटे, दिग्दर्शक जब्बार पटेल तसेच अभिनेत्री अलका कुबल यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची

यांच्या स्वतंत्र सदिच्छा भेटी घेतल्या. यावेळी विविध विषयांसंदर्भात या कलाकारांसोबत चर्चा झाली. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना विविध निर्देश देत या समस्यांवर कालबद्ध पद्धतीने काम करण्यास सांगितले. या सर्व समस्यांचे  लवकर निराकरण करण्यात येईल. राज्य शासन कलाक्षेत्राच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचेही सांस्कृतिक कार्य मंत्री मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

Check Also

राज्यात या नवीन ठिकाणांचा संवर्धन, अभयारण्ये आणि जैविविधता स्थळांचा समावेश पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम- मुख्यमंत्री

राज्यात मागील अडीच वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव, ६४७.१२९४ चौ.कि.मी ची ५ नवीन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *