Breaking News

उध्दव ठाकरे यांच्या टीकेवरून नारायण राणे यांनी साधला निशाणा, मला फोन करावा मी सांगतो काँग्रेसच्या खुलाशावर मात्र साधली चुप्पी

आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधत नामिबियातून भारतातून आणण्यात आलेले ८ चित्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च्या हाताने मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडले. यानिमित्ताने तब्बल ७० वर्षानंतर नामशेष झालेला चित्ता भारतात पुन्हा दाखल झाला. नरेंद्र मोदी यांचा हा प्रकल्प मानण्यात येत आहे. मात्र, यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधत म्हणाले, आज अनेक वर्षांनी आपल्या देशामध्ये चित्ता हा प्राणी आला आहे. मराठीमध्ये आपण त्याला चित्ता बोलतो आणि इंग्लिशमध्ये चिता बोलतात. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चित्ता सरकार म्हणायचे का? असा टोला उध्दव ठाकरे यांनी भाजपाला लगावला. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना चांगलं बोलताच येत नाही. त्यांच्याकडे चांगली वाक्य नसली तर त्यांनी मला फोन करावा, असा खोचक सल्ला देत मी त्यांना चांगली वाक्य सांगतो असा टोलाही लगावला.

चांगल्या गोष्टींच कौतुक करावं. भारतात चित्ते उपलब्ध नव्हते. पंतप्रधानांनी ते उपलब्ध करुन दिले. त्यामुळं त्यांचे धन्यवाद मानलं पाहिजे. पण, काही लोकांना चांगलं बोलता येत नाही, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

मुंबई ही शिंदे गट आणि शिवसेनेसाठी महत्वाची आहे. उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वासाठी हा दसरा मेळावा महत्वाचा वाटतो का? पत्रकारांच्या या प्रश्नावर उत्तर देत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. उध्दव ठाकरे ज्या दिवशी मुख्यमंत्री पदावरुन उतरले त्या दिवशी त्यांच अस्तित्व संपल. उद्धव ठाकरेंच अस्तित्व मातोश्रीपुरतचं मर्यादित होतं. त्यांच अस्तित्व महाराष्ट्रात आणि देशात कुठंच नाही. ते फक्त मातोश्रीच्या कक्षेपुरतचं मर्यादित होतं, अशी टीकाही त्यांनी केली.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी शिंदे गटाला मिळायला हवी असंही राणे म्हणाले. दसरा मेळावा कोणाचा होणार याचा निर्णय न्यायालयात होईल. तो शिंदे गटाच्या बाजूनं लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

२०१७-१८ मध्ये दक्षिण कोरियातून ‘हम्बोल्ड’ पेंग्विन राणीच्या बागेत आणले गेले होते. पेंग्विन खरेदीसाठी आणि त्यांच्यासाठी वातानुकूलित कक्ष तयार करण्यासाठी एकूण २५ कोटींचा खर्च करण्यात आला. त्यावेळेस मुंबईच्या महापौर राहिलेल्या किशोरी पेडणेकरांनी त्या पेंग्विनच नामकऱणही केलं होतं. त्यानंतर अनेक वेळा भाजपाकडून शिवसेनेची पेंग्विन सेना म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. आता काल १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेले ८ चित्ते सोडण्यात आले. भारतातून सात दशकांपूर्वी नामशेष झालेले चित्ते पुन्हा भारतीय भूमीवर दाखल झाले आहेत. यावरुन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर निशाणा साधला आहे. आम्ही पेंग्विन आणले म्हणून ते आम्हाला पेंग्विन सरकार म्हणतात. मग आम्ही त्यांना चिता सरकार म्हणायचे का? असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला विचारला.

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिते कुनो राष्ट्रीय उद्यानात सोडण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून एक पोस्ट व्हायरल करण्यात आली असून नामिबियातून चिते भारतात आणण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळात निर्णय घेण्यात आला होता. त्यादृष्टीने प्रक्रियाही सुरु झाली होती. मात्र नंतर यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर मोदी सरकार आल्यानंतर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मोदी यांनी हे चिते भारतात आणले. यावेळी काँग्रेसकडून तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांचा चित्यासोबतचा एक फोटोही व्हायरल करण्यात आला. त्यामुळे चिते भारतात आणण्याची कारवाई युपीएच्या काळातच सुरु झाल्याचे स्पष्ट झाले.

Check Also

इराणने ताब्यात घेतलेल्या इस्त्रायली जहाजावर १७ भारतीय क्रु मेंबरर्स

नुकतेच इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणच्या दुतावासाचे नुकसान आणि एका बड्या लष्करी अधिकाऱ्यासह अन्य चार लष्करी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *