Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, …आता कोणी तुरुंगात जाणार नाही उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली टीका

राज्यात सत्तांतर झाल्यानंतरानंतर कोरोनाची भीती असतानाही सर्व सणावरील निर्बंध शिंदे-फडणवीस सरकारने हटविले. त्यातच नुकत्याच झालेल्या दही हंडीच्या उत्सवानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा दांम्पत्याकडून आज दहीहंडीचे आयोजन करत या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता म्हणाले, आता आपले सरकार आले आहे. त्यामुळे हनुमान चालिसा पठण केले म्हणून कुणाला तुरुंगात टाकले जाणार नसल्याचे सांगत ठाकरे यांना टोला लगावला.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, आता आपले सरकार आले आहे, आता सारे कसे खुले खुले वाटत आहे. दहीहंडीचा उत्सव जोरात साजरा झाला, गणेशोत्सव देखील धडाक्‍यात साजरा होणार, उत्सव साजरे करण्यासाठी आता कुठलीही आडकाठी नसल्याचे ते म्हणाले.

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्यावतीने येथील नवाथे चौकात आयोजित दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

ते पुढे म्हणाले, काही महिन्याआधी महाराष्ट्रात हनुमंताचा जय जयकार करणे पाप समजले जात होते. अशा कठीण समयी राणा दांम्पत्य मैदानात उतरले. हनुमान चालिसाचे पठण केले म्हणून त्यांना १४ दिवस तुरूंगात रहावे लागले. अशा लढाऊ बाणा बाळगणा-या नवनीत राणा आणि रवी राणा यांचा आम्हाला अभिमान आहे. आता हनुमान चालिसा म्हटल्याने कुणाला तुरूंगात टाकले जाणार नाही असा उपरोधिक टोलाही त्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

विदर्भाला आता मागे वळून पाहण्याची गरज नाही. अमरावती जिल्हा, विदर्भ विकासाच्या दिशेने अग्रेसर झाला आहे. ही दहीहंडी विकासाची दहीहंडी आहे. या हंडीतील विकासाची मलाई ही आपल्या सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांपर्यंत पोहचविण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात देश विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे, त्याला आपल्या सर्वांची साथ हवी आहे, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला सिने अभिनेता गोविंदा, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्यासह अनेक नेते आदी उपस्थित होते. त्याचबरोबर यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुलाही करण्यात आली.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *