Breaking News

उध्दव ठाकरे यांच्याकडून अॅड गोऱ्हे यांचे कौतुक तर बंडखोरांचा उपाधीनं सन्मान गद्दांरामध्ये निवडणूकीला सामोरे जाण्याची हिम्मत नाही

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संघर्ष सुरु आहे. त्यातच शिंदे गट आणि ठाकरे गटांकडून एकमेकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच या याचिका मोठ्या खंडपीठाकडे पाठवायच्या कि त्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन व्ही रमणा यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय खंडपीठच निर्णय देणार याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझा न्यायदेवतेवर अद्यापही विश्वास असल्याचे सांगत विधान परिषदेच्या उपसभापती अॅड. नीलम गोऱ्हे यांचे मंत्री गुलाबराव पाटील यांना झापल्याबद्दल कौतुक करत बंडखोरांना पुन्हा गद्दार या उपाधीने संबोधित त्यांचा खोचक पध्दतीने सन्मान केला.

शिवसेना भवनात पक्ष पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात उध्दव ठाकरे बोलत होते. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील खोचक टोला लगावला.

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एका शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधत म्हणाले, गद्दारांमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

विधान परिषदेच्या उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खडे बोल सुनावत म्हणाल्या होत्या की, तुम्ही चौकात उभा राहून बोलताय का? मंत्री असाल तुमच्या घरी हे सभागृह आहे. येथे शिस्त पाळलीच गेली पाहिजे असे सुनावले. त्यावरून उध्दव ठाकरे यांनी गोऱ्हे यांनी जे केले ते योग्य होतं असे प्रशस्ती पत्रकही दिली.

गेल्या काही दिवसांपासून असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे प्रतिज्ञापत्र येत आहेत. आज तुम्हीही घेऊन आला आहात. मी याला आपल्या विजयाचा पहिला टप्पा मानतो. यानिमित्ताने मला एवढंच सांगायचं आहे, की उद्या न्यायालयात जे व्हायचं ते होऊ दे, मला न्याय देवतेवर विश्वास आहे. तसेच जनतेच्या भावना आपल्या बरोबर आहेत. जनता फक्त निवडणुकीची वाट बघत आहे. मात्र, निवडणुकीला सामोरे जाण्याची गद्दारांची हिंमत नाही. गद्दारांना जनताच धडा शिकवेल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, उद्या शिवसेनेतील फूटीप्रकरणी आणि १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. ७ ऑगस्ट रोजी शिवसेना आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या पाच याचिकांवर सरन्यायाधीश व्ही. एन. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर सुनावणी उद्या आणखी होणार आहे. मात्र गेल्यावेळी झालेल्या सुनावणीनुसार उद्या या पाच याचिकांवरील सुनावणी मोठ्या खंडपीठाकडे पाठवायची की विद्यमान खंडपीठच निर्णय घेणार याबाबत होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर आणखी कायदेशीर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी घटना पीठ स्थापन करण्यासंदर्भात न्यायालय काय निर्णय देते, याकडे दोन्ही गटांसह राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत असून, त्याआधी निर्णय होण्याची शक्यता शिवसेनेसह सर्वच राजकिय पक्षांकडून वर्तविण्यात येत आहे.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *