Breaking News

Editor

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, असे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी …

Read More »

सरन्यायाधीश लळीत म्हणाले, राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते …

Read More »

जयंत पाटील खोचक टोला, मग हा ईश्वरीय संकेत गुजरातला मिळाला…

काही दिवसांपूर्वी गुजरात मधील मच्छु नदीवरील झुलता पूल नव्याने उद्घाटन केल्यानंतर कोसळून १४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा दुर्घटनांवरून राजकारण काँग्रेस करू इच्छित नाही असे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. तसेच इतर राजकिय पक्षांनीही याबाबत समंज्यसपणा दाखविला. मात्र सोशल मिडीयावर पश्चिम बंगालमध्ये पूल कोसळल्यानंतर पंतप्रधान …

Read More »

‘युपीएसी’ परिक्षा प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात युपीएसीच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया ४ नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज ४ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ.के.एस.जैन यांनी दिली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय …

Read More »

केंद्रीय शिक्षण विभागाच्या प्रतवारीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या कार्यमान प्रतवारी निर्देशांकात (Performance Grading Index- PGI) एकूण एक हजार गुणांकनापैकी ९२८ गुण मिळवून महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. २०१९ च्या तुलनेत २०२०-२१ मध्ये ५९ गुणांची वाढ झाली असून भौतिक संसाधने व सुविधा (Infrastructure facilities) व शासकीय प्रक्रिया (Governance Processes) या दोन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ झाली …

Read More »

२५२ तृतीयपंथीयांना घरे मिळणार घरे

नागपूर सुधार प्रन्यासने बांधलेली २५२ घरे तृतीयपंथीयांना देण्यात येणार असून त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी तत्काळ उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वित्त विभागाला दिले. सामाजिक न्याय विभागाने नागपूरच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेशात तृतीयपंथीयांना घरे देण्यासाठी विशेष योजना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. दरम्यान, यापुढे मैला उपसण्यासाठी …

Read More »

देशावरील ५४ लाख कोटीचे कर्ज १४० लाख कोटींवर वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष नरेंद्र मोदी आणि भाजपा-पत्रकार अशोक वानखेडेंचा दावा

देश स्वतंत्र झाल्यानंतर २०१४ पर्यंत देशावर ५४ लाख कोटी कर्ज होते. ते एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४० लाख कोटी केले. हे सरकार केवळ आकड्यांचा जुगाड करून सत्य लपवत आहे. सध्याच्या वर्तमानातील सर्वाधिक कमकुवत पक्ष कोण असेल तर नरेंद्र मोदी आणि भाजपा पक्ष आहे. २०१४ साली नरेंद्र मोदी यांनी जिंकलेल्या जागांचा …

Read More »

ऑटो रिक्षा व टॅक्सीचा प्रवास महागला, जाणून घ्या कितीची झाली भाडेवाढ

ऑटो रिक्षा व टॅक्सी परवानाधरकांनी वाहनाचे इलेक्ट्रॉनिक फेर मीटर ३० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत रिकॅलिब्रेट करुन घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (पूर्व) यांनी केले आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाची नुकतीच बैठक झाली. ऑटो रिक्षा व टॅक्सी धारकांनी आकारावयाच्या भाडेदर वाढीस मान्यता दिली आहे. यामध्ये ऑटो रिक्षांसाठी प्रथम १.५ …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माझी पंतप्रधान मोदींशी चर्चा झालीय…चिंता करू नका राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध

‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल ग्रॅंड हयात येथे आयोजित ‘इंडिया टुडे कॉनक्लेव्ह’ मध्ये कार्यकारी संपादक साहिल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्य शासनाच्या विकासात्मक प्रकल्पांची माहिती देतांना मुख्यमंत्री शिंदे …

Read More »

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका, …तेच घर उध्वस्त करणे म्हणजे बेईमानी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मोठे प्रकल्प बाहेर गेले त्यातून लाखो नोकर्‍या तरुणांना गमवाव्या लागल्या आहेत...

सत्तेवर आल्यावर पक्षाच्या अनेक नेत्यांना आमिषे दाखविली जात आहेत. त्यांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. जे पक्ष सोडून गेले ते आज अस्वस्थ आहेत तसे ते बोलून दाखवत आहेत. ज्या घरात वाढलो तेच घर उध्वस्त करणे ही बेईमानी जनतेला पटलेली नाही. शिवसेना नाव आणि त्यांचे चिन्ह गोठवले तेही जनतेला रुचले नाही. …

Read More »