Breaking News

Editor

भाजपा म्हणते, त्या एका वक्तव्यावरून राज्यपालांना कोंडीत पकडू नका

भारतीय जनता पार्टीचे १८ कोटी कोट्यवधी कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन काम करतात व शिवरायांचे इतिहासातील महत्त्व कोणीही कमी करू शकत नाही, असे स्पष्ट प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केले. यावेळी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची …

Read More »

कुक्कुटपालन व्यवसायासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती

राज्यातील खासगी पद्धतीने व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी आणि कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्या यांना कुक्कुटपालन करतांना येणाऱ्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी महसूल व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती गठीत करण्यात आली आहे. या राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समितीचे अध्यक्ष हे पशुसंवर्धन आयुक्त असून …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, पीक विमा नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी लढा देणार

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतक-यांची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी …

Read More »

दुग्ध व्यवसायासाठी सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेन्मार्कशी चर्चा

दुग्ध व्यवसायात डेन्मार्क हा देश जगात अग्रेसर आहे. या देशाचे महाराष्ट्रातील पशुपालकांना मार्गदर्शन लाभले तर राज्यातील दुग्ध व्यवसायास सहाय्य होऊन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदतच होईल, त्यासाठी डेन्मार्क सरकारला सेंटर फॉर एक्सलन्स उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. डेन्मार्कच्या शिष्टमंडळाने आज सकाळी डेन्मार्कचे …

Read More »

ठाकरेबरोबरील शत्रुत्व इतके की लटकेंच्या शपथविधीला दोन्ही सभागृहाचे नेतेच गैरहजर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावित एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. या बंडखोरीवरून शिंदे-भाजपावर ठाकरे गटासह इतर राजकिय पक्षांकडूनही टीका करण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकार आणि उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर मोठ्या प्रमाणावर संबध ताणले गेले. या संबध …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीला यंग अचिव्हर्स पुरस्कार

मुंबईसह राज्यात दोन लाख कोटींचे रस्ते, रेल्वे अशा पायाभूत सुविधांची विकास कामे सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘सोसायटी अचिवर्स पुरस्कार’ प्रदान कार्यक्रमात केले. विशेष म्हणजे या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना यंग अचिव्हर्स पुरस्कार प्रधान करण्यात आला. सांताक्रूझ येथील …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आदेश, बील भरले नाही म्हणून वीज कापू नका

कोविड काळानंतर राज्यातील अनेक भागात वीज बील भरणा केला नाही म्हणून कृषी पंपासह घरगुती वीज तोडणी मोहिम महावितरणने सुरु केली. त्यामुळे अनेक भागात वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्याचे घटना सर्रास घडताना दिसून येत होत्या. त्यावर अखेर उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणला आदेश देत वीज बील भरले …

Read More »

प्रकाश आंबेडकर- उध्दव ठाकरेंच्या एकत्र येण्यावर भाजपा म्हणते, फरक पडत नाही

काल रविवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पहिल्यांदाच प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या संकेतस्थळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले. तसेच एकत्र आल्यानंतर उध्दव ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना थेट प्रकाशजी आपल्या दोघांना मिळून या गोष्टी करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला बसावं लागेल चर्चा …

Read More »

राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे गटही नाराज

‘छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श झाले आहे’, असं विधान केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरोधात राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे प्रत्येक व्यक्तींना त्यांच्याबद्दल आदर असला पाहिजे’ असं म्हणत शिंदे गटाचे नेते राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. …

Read More »

राज्यपालांच्या “त्या” विधानावर अखेर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी डि.लिट या पदवीने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवछत्रपतींची तुलना नितीन गडकरी यांच्याशी करत शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श असे वक्तव्य करत शिवाजी महाराजांचा अवमान …

Read More »