Breaking News

Editor

महाविकास आघाडीने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली का?

राज्यातून उद्योग बाहेर गेल्याची आवई उठवल्यानंतर आता ४४ खेडी कर्नाटकला दिली जाणार असल्याच्या धादांत खोट्या बातम्या पसरवणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने महाराष्ट्राला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का ? असा खडा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी उपस्थित केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या …

Read More »

अजित पवार कडाडले, महाराष्ट्र असा – तसा वाटला का?

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नुकतेच सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांवर हक्क सांगितल्यानंतर आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यावर हक्क सांगितल्याने महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बसवराज बोम्मई यांना चांगलेच सुनावले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या …

Read More »

अजित पवारांचा गौप्यस्फोट, राज्यपाल म्हणाले मुझे अभी नही रहना है

ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल महोदयांना विचारांमधील अंधार दूर होऊ दे त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे… राज्याच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना सगळ्यांच्या साक्षीने अजित पवार यांनी आज केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळयांनी बघितले ते महाराष्ट्रातील, देशातील कुणालाही …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे गटाने केली उध्दव ठाकरेंच्या राजकिय खेळीची कॉपी?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अँड प्रकाश आंबेडकर एकत्र येणार अशी चर्चा सुरु असताना आता शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना आणि दलित पँथर एकत्र येणार असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून हाती आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का देण्याच्या तयारीत आहे. …

Read More »

अजित पवारांचा सवाल, ३६५ दिवसात सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्या किती

गुजरात राज्यातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने काही ठराविक जिल्ह्यांमध्ये पहिल्यांदाच भर पगारी सुट्टी दिल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुट्यांवरही भाष्य केले. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मुळात ३६५ दिवसात जवळपास सर्वच प्रकारच्या पगारी, आजारी सुट्टया असतात त्या जवळपास पावणेदोनशे सुट्टया …

Read More »

सर्वसाधारण गुणवत्ता, तात्पुरती निवड यादी जाहीर

महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा – २०२१ या परीक्षेतील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या ६०९ व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या १०० पदांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता व तात्पुरती निवड याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत असल्याची माहिती, महाराष्ट्र लोकसेवा …

Read More »

अजित पवार म्हणाले, पीक विमा २ हजारांचा आणि खात्यात आले ७०-९० रूपये

या सरकारबद्दल शेतकऱ्यांच्या मनात फार मोठी नाराजी आहे. या सरकारने जलसमाधी घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ देता कामा नये. आम्ही सरकारमध्ये असताना आंदोलनाची भूमिका कुणी मांडली तर त्यांच्याशी चर्चा करत होतो, मात्र आताच्या सरकारला शेतकऱ्यांसोबत चर्चाच करायची नाही ही भूमिका लोकशाहीमध्ये, सरकारने ठेवणे हे अतिशय चुकीचे आहे असे विरोधी पक्षनेते अजित …

Read More »

जत तालुक्यातील गावांच्या प्रश्नावरून जयंत पाटील म्हणाले,भावनांचा गैरवापर नको

सीमा भागातील गावांची प्रकरणे न्याय प्रविष्ट असल्याने कर्नाटकातील मंडळी दिशाभूल करण्याचे काम करत आहे. आमच्या जत तालुक्यातील लोकांच्या भावनांचा गैरवापर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी करू नये असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिला आहे. जत तालुक्यातील ६५ गावे ही दुष्काळी होती. म्हैसाळच्या जुन्या योजनेचे पाणी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २०२२ नोव्हेंबरला मुंबईत राज्यस्तरीय शुभारंभ

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्रात २० नोव्हेंबर, २०२२ रोजीच्या राष्ट्रीय आवास दिनापासून ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत ‘अमृत महाआवास अभियान २०२२-२३’ राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ व महाआवास अभियान पुरस्काचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांच्या …

Read More »

वीस वर्षांपूर्वी बंद पडलेल्या कारखान्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल

सर्वाधिक वीजदरामुळे राज्यातील पोलाद कारखान्यांनी परराज्यात स्थलांतर केले असा दावा करताना काल ज्या कारखान्यांचा उल्लेख केला त्यांचे काम आठ ते तेवीस वर्षांपूर्वीच बंद झाले आहे. वीस वर्षांपूर्वी राज्यात बंद झालेल्या कारखान्यांच्या नावांचा वापर करून जनतेची दिशाभूल करणे निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी बुधवारी व्यक्त केली. विदर्भ …

Read More »