Breaking News

Editor

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १९ डिसेंबरपासून २९ डिसेंबरला ठरणार पुढील कामकाजाचे दिवस

विधिमंडळाचे सन २०२२ चे हिवाळी अधिवेशन सोमवार १९ डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होत आहे. १९ ते ३० डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आणि विधानपरिषद कामकाज …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, महाराष्ट्रात कायद्याचे राज्य राहिले आहे का ? सत्तेची मस्ती चालू देणार नाही सत्ताधाऱ्यांच्या मस्तवालपणा विरोधात मुंबईत १७ तारखेला महाविकास आघाडीचा महामोर्चा

महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने चार महिन्यातच राज्याचा नावलौकिक रसातळाला मिळवला असून महापुरुषांचा अपमान सातत्याने केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करुनही भाजपा नेत्यांवर कारवाई होत नाही. महापुरुषांच्या अपमानाबद्दल जनतेत तीव्र संताप आहे पण सत्ताधारी मात्र विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहेत. …

Read More »

अखेर त्या वक्तव्याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांच्याकडून जाहिर माफी माफीनाम्याचे पत्रच चंद्रकांत पाटील यांच्याकडून जारी

महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर माफी मागितली. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि …

Read More »

शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला, देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे ८२ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाला उत्तर देताना दिले लगावला टोला

आज आपण अडचणीच्या काळातून जात आहोत. त्यामध्ये भाजपाचे राज्य आहे. लोकशाहीच्या मार्गाने राज्य आल्यानंतर त्याला विरोध करायचा नसतो. ती समाजहिताची नसतील तर त्याच पध्दतीची भूमिका घ्यायची असते. परंतु राज्यकर्त्यांनी सुध्दा संबंध देशातील प्रांताकडे बघताना आपण देशाचे नेतृत्व करतो याचे भान ठेवले पाहिजे असे खडेबोल शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

‘निर्भया’ निधीतील वाहनांबाबत सुप्रिया सुळेंचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या…. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा घणाघात

निर्भया निधीतील वाहनांबाबत खा. सुप्रिया सुळे , खा. प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा सारखा प्रकार आहे. निर्भया निधीतून खरेदी केलेली वाहने मविआ सरकारच्या कार्यकाळातच मंत्र्यांच्या दावणीला बांधली गेली होती , असा घणाघात भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सोमवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार …

Read More »

अजित पवार म्हणाले, मी आज बिन पाण्याची करण्याचं ठरवलं नव्हतं शरद पवार यांच्या वाढदिनी कार्यकर्त्ये नेत्यांना अजित पवारांकडून कान पिचक्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी भाषण करत शरद पवारांना शुभेच्छा दिल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी भाषण केले. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना टोला लगावल्याचे …

Read More »

पेपरलेस लाईट बिलाची सुरुवात करा अन वीज बिलात १० रूपये सूट मिळवा गो ग्रीन योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली असून त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने महावितरणने बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले असून गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी आणि प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी, असे …

Read More »

भाजपाचा सवाल, शाईफेकीला समर्थन हेच राष्ट्रवादीचे मुख्य धोरण आहे का ? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल

सत्ता गेल्याचे वैफल्य आणि शिंदे-फडणवीस सरकारचा विकास कामांचा झपाटा यामुळे आलेल्या नैराश्यातून व विरोधाचे ठोस मुद्दे हाती नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने खालच्या दर्जाचे राजकारण सुरू केले असून शाईफेकीसारखे हीन प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसने सुरू केले आहेत. कायदा हाती घेऊन शाईफेकीला समर्थन हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे का, याचा खुलासा राष्ट्रवादीचे राज्यातील नेते शरद …

Read More »

नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले; उपचाराची गरज महापुरुषांबद्दल भाजपा नेत्यांचे खायचे व दाखवायचे दात वेगळे

निवडणुकीच्यावेळी महापुरुषांचे आशिर्वाद घेऊन मतांची भीक मागणारे भारतीय जनता पक्षाचे नेते निवडणुका संपल्यानंतर मात्र याच महापुरुषांचा अपमान करतात. महाराष्ट्रात राहूनच महाराष्ट्रातील महापुरुषांचा अपमान करण्यात भाजपा नेत्यांमध्येच स्पर्धा लागल्याचे दिसत आहे. महापुरुषांचा अपमान करणाऱ्या या नेत्यांवर भाजपाने कारवाई केली नाहीच पण साधा निषेध करण्याचे अथवा समज देण्याचे सौजन्यही दाखवले नाही उलट …

Read More »

अखेर मार्गदर्शनासाठी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, अमित शाहजी मला मार्गदर्शन करा माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नव्हता, मार्गदर्शन करा

मराठवाडा विद्यापाठीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना त्यांच्या सामाजिक आणि राजकिय योगदानाबद्दल डि.लिट पदवीने सन्मानित करण्यात आले. विशेष म्हणजे ही पदवी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते शरद पवार आणि नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणा दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी शिवाजी महाराज …

Read More »