Breaking News

Editor

अजित पवार यांचा आरोप, आताचे सरकार साहित्य, संस्कृती क्षेत्राला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतेय प्रज्ञा दया पवार, निरजा यांनी निवड समितीचे राजीनामे दिले हे सरकारसाठी लांच्छनास्पद नाहीय का?...

अनुवादित साहित्यासाठी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाड्मय पुरस्कार अनघा लेले यांना कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या पुस्तकाच्या अनुवादासाठी जाहीर झाला. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर मागील सहा दिवसात पडद्यामागे काही बर्‍याच घडामोडी झालेल्या दिसत असून १२ डिसेंबरला अचानक राज्य सरकारने आदेश काढत पुरस्कार निवड समिती बरखास्त केली आणि कोबाद गांधी यांच्या …

Read More »

आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा मंजूर, कामगार कायद्यात होणार सुधारणा राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

देवेंद्र फडणवीस सरकारचे लाडके महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. आता आशुतोष कुंभकोणी यांच्या ठिकाणी अँड. विरेंद्र सराफ यांची महाधिवक्ता पदी नियुक्ती करण्यात येणार असल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे. सराफ हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय दोन आठवड्यानंतर झाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक

गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जवळपास दोन आठवडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली नाही. त्यामुळे आज शिंदे-फडणवीस सरकारने राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत एकदम १५ निर्णय घेतले. यामध्ये कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुषंगाने आणि शाळा आणि ग्रंथालय अनुदान मंजूर, यासह अनेक महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले. जवळपास १५ निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले ते …

Read More »

फडणवीस सरकारच्या काळातील त्या दोन निर्णयाची पुन्हा नव्याने अमंलबजावणी जलयुक्त शिवार अभियान परत सुरु करणार आणि मुख्यमंत्री फेलोशिप प्रोग्राम

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थानापन्न झाल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आलेल्या निर्णयांची परत अमंलबजावणी करण्यास सुरुवात करण्यात येत आहे. यापूर्वी आणिबाणी काळात तुरुंगवास भोगलेल्या अनेकांना राज्य सरकारने पेन्शन देण्याचा निर्णय फडणवीस सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात रद्द करण्यात आला होता. तो निर्णय पुन्हा …

Read More »

महाराष्ट्रातही आता रंगणार फुलबॉलचा खेळः जर्मनीबरोबर केला करार जी- 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल-क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन

राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला . हा होणारा सामंजस्य करार  जी 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. आज मंत्रालयात क्रीडा व युवक …

Read More »

मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना दिली मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक …

Read More »

शरद पवारांना आधी फोनवरून त्रास नंतर जीवे मारण्याची धमकी अखेर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिवाळीच्या आधीपासून एका उत्तर भारतातील नारायण सोनी नामक व्यक्तीकडून सिल्व्हर ओकवरील निवासस्थानावरील फोनवरून सातत्याने त्रास दिला जात होता. विशेषतः दिवाळीत तर या व्यक्तीकडून दिवसाला शंबभरवेळा फोन करून त्रास देत अर्वाच्च भाषेचा वापर केला जात होता. त्यानंतर सोनी नामक व्यक्तीकडून शरद पवारांना मुंबईत येऊन देशी कट्ट्याने …

Read More »

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणार कौशल्य प्रशिक्षण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कौशल्य विकास मंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत झाला सामंजस्य करार

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना आता विविध प्रकारचे कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी आज राज्य शासनाचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, शालेय शिक्षण विभाग आणि बृहन्मुंबई महापालिका यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, …

Read More »

शेर्पा अमिताभ कांत म्हणाले, डेटाच्या उत्तम वापरातूनच व्यापक विकास शक्य जी-20 परिषदेच्या पहिल्या सत्रात डेटा फॉर डेव्हलपमेंट : रोल ऑफ जी २० इन ॲडव्हान्सिंग द २०३० अजेंडा या विषयावर परिषद

माहिती तंत्रज्ञानाच्या जगात डेटाच्या (माहितीच्या) उत्तम वापरातून देशाचा व्यापक विकास शक्य होणार आहे, उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक क्षेत्रानुसार त्याचे विश्लेषण करता येऊ शकते. विकसनशील देशाचा विकास करायचा असेल तर डेटा (अद्ययावत माहिती) संकलित करणे, त्याचे विश्लेषण, संप्रेषण करणे आणि उपलब्ध डेटावर कृत्रिम बुद्धिमत्ता याचा वापर करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या विकासासाठी एक …

Read More »

‘ज्ञानदीप’ संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे आदेश कोणाचे? 'महाज्योती'ला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून ओबीसी-व्हिजेएनटी मुलांचे हक्क हिरावून घेऊ नका ! नाना पटोले

राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी विभागाने पुण्यातील ‘ज्ञानदीप’ संस्थेला तिप्पट शुल्कवाढ देण्याचे प्रस्तावित करून कोणाचा फायदा करून दिला जाणार आहे. वर्षाला ६ टक्के दरवाढ मंजूर असताना २०० टक्के शुल्कवाढ कोणाच्या सांगण्यावरून केली तसेच महाराष्ट्रात अनेक नामांकित कोचिंग क्लासेस असताना ‘ज्ञानदीप’ वरच विशेष मेहेरबानी का? ‘महाज्योती’ला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून शिंदे-फडणवीस सरकारने ओबीसी-व्हिजेएनटी मुलांचे …

Read More »