Breaking News

कापूस खरेदीला सोमवारपासून सुरूवात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती

सातारा : प्रतिनिधी
लॉडाऊनच्या काळात शेतकऱ्यांचा माल वाया जावू नये यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्यांच्याकडील कापसाची खरेदी राज्य सरकार कडून करण्यात येणार आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशसह संपूर्ण महाराष्ट्रात कापूस खरेदी केंद्रांमध्ये या कापसाच्या खरेदीला सोमवार २० एप्रिलपासून सुरुवात केली जाणार असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांचे अर्थकारण या कापूस उद्योगावर अवलंबून आहे. कापसाचे उत्पादन चांगल्या प्रतीचे झालेले प्रकारचे झालेले आहे. शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी केंद्रावर आणावा. कापूस खरेदी केंद्र व कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी संयुक्तिक नियोजन करावे. जे शेतकरी ऑनलाईन व फोनद्वारे बुकिंग करतात, त्या शेतकऱ्यांना कोणत्या दिवशी, कोणत्या वेळेत कापूस केंद्रावर आणावा हे त्यांना कळवले जाणार आहे. कापसाची प्रत तपासून त्याचे वजन करून कापूस खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी पिकवलेला कापूस सध्या त्यांच्या घरांमध्ये आहे. तो खरेदी करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये असणाऱ्या सूचनांचे पालन करून कापूस खरेदीचे व्यवहार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापसासह घरामध्ये सुरक्षितता म्हणून साठवून ठेवलेला कापूसही खरेदी केला पाहिजे अशी शासनाची भूमिका असल्याची माहितीही सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *