विजय वडेट्टीवार यांची मागणी जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांनी राजीनामा द्यावा या घोटाळ्यातील अमेडिया कंपनीचे पार्टनर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे

पुण्यातील कोरेगाव पार्क येथील जमिनीची खरेदी करण्यात आली,त्यावर स्टॅम्प ड्यूटी माफ करण्यात आली आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना यातील काहीच माहित नव्हते? या जमीन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, एखाद प्रकरण झालं, ते अंगलट आले की उपमुख्यमंत्री अजित पवार हात झटकतात..आता तर पुण्यातील जमिनीचे प्रकरण आहे, त्यांच्या मुलाने व्यवहार केला आहे, प्रकरण वाढल्यावर माझा याच्याशी संबंध नाही अस बोलून उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदारी झटकू शकत नाही अशी टीकाही यावेळी केली.

विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणी अमेडिया कंपनीने व्यवहार केला. या कंपनीत पार्थ पवार पार्टनर आहेत, त्यांच्या सह्या आहेत मग गुन्हा फक्त दिग्विजय पाटील वर का दाखल झाला? महायुती सरकार म्हणजे तू खा, मी ही खातो आणि एकमेकांना वाचवू अस संगनमताने काम सुरू आहे अशी उपरोधिक टीकाही यावेळी केली.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, पुणे जमीन घोटाळाप्रकरणी आता सांगण्यात येत आहे की दिग्विजय पाटील याला व्यवहार करण्यासाठी अधिकार देण्यात आले होते,पण व्यवहार करायला पैसे आले कुठून? व्यवहार कुणामुळे झाला? कुणामुळे स्टॅम्प ड्युटी माफ झाली? पार्थ पवार यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यामुळे या प्रकरणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली पाहिजे या प्रकरणाशी सबंधित महसूल विभागाचे अधिकारी,उद्योग संचानालय,शीतल तेजवानी सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.

पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार काल म्हणाले, तीन महिन्यापूर्वी कानावर आले, चुकीच्या गोष्टी मला चालणार नाही अस सांगितलं होते. मग तेव्हाच पार्थ पवार यांना अजित पवार यांनी का थांबवले नाही? घरात हा व्यवहार होतो हे माहीत होते तेव्हाच थांबवले असते तर हा घोटाळा घडला नसता असा सवालही यावेळी केला.

शेवटी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आरक्षण प्रकरणी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. कुणाबरोबर वैचारिक मतभेद असू शकतात पण म्हणून त्यांच्या जीवावर उठणे हे महाराष्ट्रात शोभत नाही त्यामुळे जरांगे पाटील यांना अधिकचे पोलिस संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही यावेळी केली.

About Editor

Check Also

चंद्रकांत पाटील यांची माहिती, उच्च शिक्षण विभागांतर्गत मुंबईतील कार्यालये एकाच ठिकाणी होणार चेंबूर येथील उच्च शिक्षण विभागाच्या इमारत बांधकामास गती द्यावी

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली काही महत्वाची कार्यालय आणि विभागीय कार्यालय मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *