Breaking News

एस.टी.च्या त्या १ हजार १० रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पुन्हा समावेश पण कंत्राटीवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना उशीरा जाग

मुंबई : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपात सहभागी झाल्याबद्दल १ हजार १० कर्मचाऱ्यांच्या सेवा एस.टी.च्या स्थानिक प्रशासनाने सेवा समाप्त करण्याचा निर्णय घेतला होतात्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबत अखेर दिवाकर रावते यांना उशीराने जाग आली असून तसे निर्देश त्यांनी एस.टी.प्रशासनाला दिले. मात्र या कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीवरच नव्याने नियुक्ती देण्यात येणार आहे.

हे रोजंदारी कर्मचारी महामंडळाच्या सेवेत मागील दोन ते तीन महिन्यांपूर्वीच रुजू झाले होते. या कर्मचाऱ्यांचा अघोषित संपाशी काहीही संबंध नव्हता तरी देखील हे कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे एस.टी.चे आर्थिक नुकसान होताना प्रवाशांची प्रचंड प्रमाणात गैरसोय देखील झाली. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाने अशा सर्व कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त केली होती.

सेवा समाप्तीचा हा निर्णय मागे घेण्याबाबत प्राप्त झालेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करून हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहन मंत्र्यांनी निदेश  दिले होते. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या आदेशाचे पालन करत अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने नियुक्ती देण्याचे निश्चित केले  असून  यासंदर्भातील परिपत्रक दि. २५ जून२०१८ रोजी निर्गमित केले आहे.

या परिपत्रकाप्रमाणे ज्या चालक तथा वाहक (कनिष्ठ)सहाय्यक लिपिक-टंकलेखक (कनिष्ठ) यांनी दि. ८ जून व दि. ९ जून २०१८ रोजी झालेल्या अघोषित संपात सहभाग घेतला आहे व ज्यांची सेवा विभाग/ घटक प्रमुख यांनी समाप्त केली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना दि. १ जुलै २०१८ पासून नव्याने नियुक्ती दिली जाईल.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *