Breaking News

लोकशाही पायदळी तुडविणारेच लोक आता संविधान बचावचा नारा देतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी

व्यक्ती स्वातंत्र  हिरावून घेत ज्यांनी देशात जाचक आणीबाणी लादून संविधान पायदळी तुडवले, तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत असल्याची टीका काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करत २६ जून १९७५ साली इंदिरा गांधी सरकारने देशात आणबाणी जाहीर करत सरकार विरोधी बोलणाऱ्यांना तुरुंगात डांबण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

एआयआयबीच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एआयआयबी बँकेचे जीन युन आदी उपस्थित होते.

देशात १९७५ साली इंदिरा गांधीं सरकरने देशात आणीबाणी जाहिर केली होती.त्यावेळी सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर आणि प्रसारमध्यमांवर बंधने लादली गेली. न्यायव्यवस्थेवर अंकुश लावले गेले. त्या काँग्रेसने संविधान पायदळी तुडवले. तेच लोक आता संविधान बचावचा नारा देत आहेत. काँग्रेसकडून भाजप विरोधात दलितांमध्ये, मुस्लिम समाजात भय निर्माण करत असल्याचा आरोप करत भाजपने नेहमीच संविधानाचा सन्मान केला असून समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय देण्याची भूमिका अंगीकारल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसने आपल्या सत्तेच्या काळात कधीही संविधान दिवस साजरा केला नाही.पण भाजपने संसदेसह देशभरात संविधान दिन घोषित केल्याचे आवर्जून त्यांनी सांगितले.

सर्वजण या काळ्या दिवसाचा धिक्कार करतात, हे पाप काँग्रेसचे आहे. केवळ एक घराण्याने देश वेठीला धरल्याचे सांगत  राजकीय पक्षावर टीका म्हणून आणीबाणीचा २६ जून काळा दिवस पाळला जात नाही. तर लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी म्हणून या काळ्या दिवसाचे स्मरण करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

आम्ही देशातल्या तरुणांना जागृत करत आहोत, त्यांना सज्ज करण्यासाठी या काळ्या दिवसाचा आम्ही धिक्कार  करतो. मोठ्या चतुराईने तत्कालीन सरकारने घटनेचा गैरवापर केला होता. या देशात जेव्हाही काँग्रेसची सत्ता चालली असे वाटते, तेव्हा ते भय निर्माण करतात. काँग्रेसची मोठ्या नेत्यांची परंपरा आहे, सत्तेसाठी त्यांनी( इंदिरा) आपली पार्टी ही फोडली, त्यांच्यासाठी व्यक्ती स्वतंत्र ,संविधान याची काहीही किंमत नाही. त्यांनी देशाच्या न्यायव्यसंस्थेला ही भयभीत केल्याचा आरोप त्यांनी केला.

देशात आता स्तिथी बदलत आहे. ज्यांनी देशात व्यक्ती स्वातंत्रावर गदा आणली. त्याच्यावरही केसेस सुरू असून त्यांनाही आता जामीन घ्याव्या लागतोय असा टोला ही त्यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लगावला. हातातून सत्ता जातेय म्हणून ते आता  प्रशासन आणि न्यायावस्थेत तसेच निवडणूक व्यवस्थेत घोळ असल्याची आवई उठवत आहेत.काँग्रेस ४०० वरून ४४ वर आलीय. जनतेत झालेला बदल काँग्रेसला नको असल्यानेच ते ईव्हीएम मशीनला दोष देत असल्याची टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही यावेळी भाषण झाले.आणीबाणीचा त्यांच्या कुटुंबा कसा त्रास सहन करावा लागला हे त्यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ते पाच वर्षांचे असताना देशात आणीबाणी लागू झाली होती,त्यावेळी त्यांचे वडील यांनाही तत्कालीन काँग्रेस सरकारने दोन वर्षे तुरुंगात टाकले होते. मात्र संविधान वाचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यानी लढा सुरुच ठेवल्या होता असेही त्यांनी सांगितले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *