Breaking News

भाजपाने राहुल गांधीच्या टी-शर्ट वरून साधला निशाणा: काँग्रेसचा सवाल, घाबरलात की काय? भाजपा आणि काँग्रेसमध्ये रंगले ट्विट वॉर

केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसने सुरु केलेल्या भारत जोडो पदयात्रेचा आज तिसरा दिवस या पदयात्रेची सुरुवात कन्याकुमारी येथून बुधवारी ७ सप्टेंबर २०२२ रोजी झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी या वेळी राहुल गांधी यांच्या हाती तिरंगा ध्वज सोपावला. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी ३५७० किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. मात्र, आता यात्रेवरून भाजपाने टीका करायला सुरुवात केली असून आज भाजाकडून यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या टी-शर्टवरून निशाणा साधला. भाजपाने साधलेल्या निशाण्याला काँग्रेसनेही चोख प्रत्युत्तर भाजपाला माघारी रेटल्याचे चित्र सोशल मिडीयावर पहायला मिळाले. भाजपाने केलेल्या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले.

नाना पटोले ट्विट करत म्हणाले, ‘भाजपचे भय संपत नाही.! राहुल गांधींबद्दल टी-शर्टची किंमत वगैरे असे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागणे यातूनच सिद्ध होतंय की “भारत जोडो यात्रे” मुळे भाजपाला धडकी भरली आहे. राहुल गांधींबद्दल भाजपाचे भय संपत नाही आणि आठवण करूनच द्यायची झाली तर आपल्या देशाला एक असे फकीर लाभले आहेत जे १० लाख रुपयांचा सुट परिधान करतात.’ असा खोचक टोलाही लगावला आहे.

याशिवाय भाजपाने राहुल गांधी यांच्याबाबत केलेल्या ट्विटला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुटबद्दल चर्चा करायची का? असं आव्हान देखील दिले. काँग्रेसने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘भारत जोडो यात्रेला नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून घाबरला काय. बेरोजगारी आणि महागाईच्या मुद्यावर चर्चा करा. बाकी कपड्यांवर चर्चा करायची झाली, तर मोदींचा १० लाख रुपयांचा सुट आणि १.५ लाख रुपयांच्या चष्म्यापर्यंत गोष्ट जाईल,’ असं सडेतोड प्रत्युत्तरही काँग्रेसने दिले.

राहुल गांधी नेहमी कुर्ता आणि पायजम्यामध्ये सर्वांना दिसतात. पण, भारत जोडो यात्रेच्या प्रवासावेळी त्यांनी टी-शर्ट आणि पँट घातली आहे. त्यांनी घातलेल्या टी-शर्टच्या किंमतीवरून भाजपाने राहुल गांधींवर टीका केली आहे. भाजपाने याबाबत ट्विट करत राहुल गांधी यांनी ब्रिटिश लग्जरी कंपनीच्या ब्रँडचा बर्बेरी हा पांढरा टी-शर्ट घातला आहे. त्याची किंमत ४१ हजार २५७ रुपये असल्याचं सांगितलं आहे. तसेच, ‘भारत देखो’ असे कॅप्शनही त्यावर लिहलं आहे.

Check Also

अरविंदरसिंग लवली अखेर भाजपामध्ये दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी आप AAP सोबतच्या युतीमुळे अलीकडेच दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *