Breaking News

गोपिचंद पडळकर यांचा शरद पवारांवर निशाणा, तर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष जसे पळाले तसे पळावं लागेल विसर्जन करावं लागणार त्यांचे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामतीच्या दौऱ्यावर असताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला. श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना पळून जावे लागेल अशा कडवट शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केली.

आता गणपती विसर्जन आहे. तेव्हा येणाऱ्या २०२४ साली पवारांचे विसर्जन करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बारामती दौऱ्यावर आले असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी यावेळी म्हटले.

तसेच देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन या बिन टाक्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर आहेत. बारामती लोकसभेचे कधी ऑपरेशन होईल हे पवारांना कळणारही नाही, अशी खोचक टीका त्यांनी केली.

एखाद्याला फसविण्यात लुबाडण्यात बारामतीकरांना फार आनंद असतो, असे बोलताना राज्यात जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा सुप्रिया सुळे या वरमाई सारख्या फिरत होत्या अशी टीका करून पडळकर म्हणाले की, श्रीलंकेतील नेते पळून गेले तसे पवारांना आता पळून जावं लागणार आहे. मराठा आरक्षण यांना देता आलं नाही. ओबीसी आरक्षण देवेंद्र फडणवीस सत्तेत आलं की परत मिळवलं, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांचे निर्विवाद वर्चस्व असलेला बारामती हा बालेकिल्ला नाही तर साधी टेकडी असल्याचे म्हणत मी दोन वर्ष ही टेकडी ठोकून काढत आहे. पवारांचे राजकारण हे पोलिसांवर चालते. त्यामुळे माझ्यावर खूप केसेस आहेत. या केसेस म्हणजे अंगावरील दागिना समजा असेही त्यांनी पडळकरांनी कार्यकर्त्यांना सांगत स्वतःची पाठ थोपटून घेतली.

अजित पवारांनी बंड केले तेव्हा दोन तृतीयांश आमदार त्यांच्या मागे राहिले नाहीत. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडात ५० आमदार गेले. देवेंद्र फडणवीस यांना सत्तेत बसू द्यायचं नाही असे त्यांचे चालू होतं तरी देखील ते सत्तेत आले. हे शरद पवारांचे दु:खणं आहे. भाजपामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचा नेहमीच सन्मान होतो २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते. पण विधान परीषद सदस्यत्व देऊन त्यांचा सन्मान केला. आता बावनकुळे हे २८८ मतदारसंघात तिकीट वाटप करणार हा त्यांचा मोठा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

राहुल गांधी यांचा रायबरेलीतूनही अर्ज दाखल, तर अमेठीतून के एल शर्मा

यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून यावेळी उमेदवारी अर्ज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *