Breaking News

मुख्यमंत्री शिंदेंनी नाराज मंत्र्यांना केले खुष; स्वत:कडील खात्यांची जबाबदारी “या” मंत्र्यांकडे संदीपान भुमरे, दादा भुसे, शंभुराज देसाई, दिपक केसरकर यांच्यासह आठ जणांकडे सोपविली जबाबदारी

मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खाते वाटप जाहिर केले. परंतु शिंदे गटातील अनेक मंत्र्यांना मिळालेल्या खात्यांचे वाटप रूचलेले नसल्याने अनेक मंत्री नाराज असल्याची चर्चा शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये सुरु झाली. त्यातच बुधवारपासून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याच्या यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याकडील अतिरिक्त असलेल्या खात्यांचा कारभार नाराज मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेत नाराज मंत्र्यांना खुष करून टाकले आहे.

यासंदर्भातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभापतींना लिहिलेले पत्र मराठी ई-बातम्याच्या हाती आले आहे.

सध्य परिस्थितीत उदय सामंत यांच्याकडे फक्त उद्योग खाते होते. आता त्यांच्याकडे माहिती व तंत्रज्ञान या खात्याचा अतिरिक्त पदभारही सोपविण्यात आला आहे. तर शंभुराज देसाई यांच्याकडे फक्त राज्य उत्पादन शुल्क या विभागाचा कार्यभार होता आता त्यांच्याकडे परिवहन मंत्रालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे. याशिवाय नाराज असलेल्या दादाजी भुसे यांना बंदरे व खनिकर्म हे खाते मिळाले होते. आता त्यांच्याकडेही पणन खात्याचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. संजय राठोड यांच्याकडे यापूर्वी अन्न व औषध प्रशासन खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता. आता त्यांच्याकडे राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय या खात्याची जबाबदारीही सोपविण्यात आली. याशिवाय सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे मृद व जलसंधारण विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेले पर्यावरण खाते आपल्याला मिळावे यासाठी लक्ष ठेवलेले दिपक केसरकर यांच्याकडे सध्या शालेय शिक्षण हे खाते होते. आता या खात्याबरोबर त्यांच्याकडे पर्यावरण विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर नाराजी मंत्री म्हणून ओळखले जात असलेल्या संदीपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन हे खाते देण्यात आले होते. आता त्यांच्याकडे अल्पसंख्याक व औकाफ या खात्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे.

तसेच अब्दुल सत्तार यांच्याकडे सध्या कृषी विभागाची जबाबदारी असून त्यांच्याकडे आता मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन या विभागाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत:कडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), सामान्य प्रसाशन, नगरविकास, माहिती व जनसंपर्क या विभाग आदी खाती स्वत:कडे ठेवली आहेत.

या सर्वांकडे सदर खात्यांची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पत्र सभापतींना विधान परिषद यांना पाठविण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेच ते पत्र:

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *