Breaking News

भाजपा नगरसेविकेच्या पतीने मुस्लिम असल्याच्या संशयावरून केली ज्येष्ठ नागरीकाला मारहाण मारहाणीनंतर ज्येष्ठ नागरीकाचा मृत्यू

मागील काही दिवसांपासून संबध देशभरातच मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याचे प्रकार सुरु आहेत. राम नवमी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी तर देशात १९ ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र नुकतेच भाजपाच्या एका माजी नगरसेविकेच्या पतीने एका ज्येष्ठ नागरीकांस मुस्लिम असल्याच्या संशयावरून मारहाण केली. या मारहाणीत सदर व्यक्तीचा मृत्यूही झाला. याप्रकरणात उशीराने पोलिसांनी सदर नगरसेविकेच्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

काही दिवसांपूर्वी खरगोण येथील हिंदू-मुस्लिम समुदायाच्या मध्ये झालेल्या गोंधळाच्या कारणावरून मुस्लिम समुदायातील अनेकांची घरे बेकायदेशीर असल्याचे कारण पुढे करत मध्य प्रदेश सरकारने ती बुलडोझर लावून पाडली. तसेच भाजपाकडून मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. मात्र एखाद्या ज्येष्ठ नागरीकाला मुस्लिम असण्याच्या कारणावरून जीव जाई पर्यत मारहाण केल्याची घटना घडली. यासंदर्भात एक व्हिडिओही एनडीटीव्हीने आपल्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

सदरचा प्रकार हा मध्य प्रदेश येथील नीमुच जिल्ह्यात घडली असून एक ज्येष्ठ नागरीक जो मानसिकरित्या आजारी असलेला व्यक्ती चुकला होता. त्यामुळे तो आपल्या घरी न जाता भटकत राहिला. यासंदर्भात सदर व्यक्तीच्या घरच्यांनी ज्येष्ठ नागरीक हरविला असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल केली. याशिवाय त्या व्हिडिओमध्ये जो व्यक्ती त्या ज्येष्ठ व्यक्तीला मारहाण करतोय त्याची ओळख पटली असून त्याचे नाव दिनेश कुशवाह असे असून त्याची पत्नी भाजपाची माजी नगरसेविका आहे.

तर ज्या ज्येष्ठ व्यक्तीला कुशवाहने मारहाण केली, त्यांचे नाव भंवरलाल जैन असे असून रत्लाम जिल्ह्यातील सरसी येथील रहिवाशी असून राजस्थान येथील धार्मिक कार्यक्रमाला हे कुटुंबिय गेले होते. तो कार्यक्रम १५ मे रोजी झाल्यानंतर ते हरविले होते. पोलिसांनीही जैन यांच्या शोधासाठी फोटो प्रसारीत केला होता. मात्र कुशवाह याने मारहाण केल्यानंतर जैन यांचा मृतदेह नीमुच जिल्ह्यातील एका रस्त्याच्या पडलेला काल आढळून आला. पोलिसांनी जैन यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली केला. तर कुशवाह यांच्या विरोधात पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; तर या चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *