भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील ६७ रिक्त पदे भरली जाणार आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ५ जून २०२२ पर्यंत व त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावेत असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक, डाकघर, नवी मुंबई विभाग यांनी केले आहे.
https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरता येतील. अन्य कोणत्याही माध्यमाद्वारे आलेले अर्ज व व्यक्तिश: आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच अर्जदाराला अर्जाचे शुल्क प्रधान डाकघर, पनवेल-४१०२०६ येथे जमा करता येईल.
टपाल विभाग उमेदवारांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत नाही. संबंधित प्राधिकरणाद्वारेच उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जातो. उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, नोंदणी क्रमांक, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी इतरांसमोर उघड करु नयेत आणि अनधिकृत दूरध्वनी संदेशापासून सावध रहावे. अधिक माहितीसाठी https://indiapostgdsonline.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags post office post office recruitment recruitment
Check Also
निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …