Breaking News

दिड दिवसांच्या अखेर नाट्यानंतर राणा दांमप्त्यांकडून आंदोलन स्थगित पंतप्रधानांच्या दौऱ्याचे कारण पुढे करत अखेर केली घोषणा

मागील दिड दिवसांपासून मातोश्रीच्या समोर जावून हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा करणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना शिवसेनेच्या विरोधात आठमुठी भूमिका घेतली होती. मात्र शिवसैनिकांनी मातोश्रीबरोबरच राणा दांम्पत्याच्या खार येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे अखेर राणा दांम्पत्यांनी घराबाहेर पडण्यापेक्षा घरातूनच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा असून या दौऱ्याला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून आमचे आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

काहीही करून मातोश्रीसमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याची घोषणा राणा दांम्पत्यांनी केली होती. त्यानुसार ते काल २२ एप्रिल रोजी त्यांनी मातोश्रीच्या सममोर जावून चालिसा म्हणणार असल्याची घोषणा केली होती.

त्यानुसार वांद्रे येथील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याच्या अवती भोवती मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक जमा झाले. तसेच जर राणा दांम्पत्यांनी मातोश्रीवर यावेच त्यांना चालिसाचा महाप्रसाद दिल्याशिवाय पाठविणारच नाही असा गर्भित इशारा युवासेनेचे नेते वरूण सरदेसाई यांनी दिला होता. त्यानंतर आज २४ तारखेला सकाळी नऊ वाजता राणा दांम्पत्य येवून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वीच पोलिसांनी या दोघांना नोटीस बजावली. तरीही राणा दांम्पत्य आपल्या आंदोलनावर ठाम होते.

मात्र आज सकाळपासून शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर राणा दांम्पत्यांच्या खार येथील निवासस्थानी जमा होत त्यांच्या घरात घुसण्याच्या प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पुरेशी खबरदारी घेतली. त्यामुळे शिवसैनिकांना त्यांच्या घरात घुसता आले नाहीत.

दरम्यान, शिवसैनिकांचा रोष आणि संतापाची भावना पाहता अखेर रवि राणा यांनी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्या असलेल्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

तर दुसऱ्याबाजूला राणा दांम्पत्यांनी माफी मागावी अन्यथा त्यांना घराच्या बाहेर पडू देणार नाही असा इशारा राणा दांम्पत्यांना देत खार निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केले. मात्र पोलिसांकडून शिवसैनिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र राणा दांम्पत्यांनी माफी मागितल्याशिवाय बाहेर न जावू देण्याच्या मागणीवर ठाम आहेत.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *