Breaking News

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून शरद पवार म्हणाले की, चित्रपटामुळे मनं … पुण्यातील कार्यक्रमात केली टीका

मागील काही दिवसांपासून काश्मीरी पंडीतांच्या पलायनावर आधारीत द काश्मीर फाईल्स हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर या चित्रपटाच्या अनुषशंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट सर्वांनी पहावा असे आवाहन देशातील जनतेला केले. त्यावरून देशभरातील वातावरण चांगलच तापलेले असून यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिल्यांच प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच भाजपा आणि केंद्र सरकारवरही टीकेचा भडीमार केला.

सध्या विद्वेषाचं राजकारण सुरु असल्याची खंत शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. पुण्यात आज माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते.

विरोधकांना टीका करण्याचा अधिकार आहे. मात्र, टीका करताना विद्वेष नसायला हवा. मात्र अलिकडे तेच अधिक पाहायला मिळत आहे. राजकारण चुकीच्या दिशेला जात आहे. काश्मिरमधील एक घटक निघून गेला. त्यावर एक चित्रपट आला, काँग्रेसवर टीका झाली. मात्र, या चित्रपटामुळे मनं जोडण्याऐवजी मनं तोडण्याचं काम झालं. समाजात विद्वेष पसरवायला मदत केली जाते. पंतप्रधानांकडूनही त्यावर भाष्य केलं जातं. या चित्रपटाच्या माध्यमातून गांधींवर टीका-टिप्पणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मिरमधून काश्मिरी पंडित बाहेर पडले तेव्हा सत्तेत काँग्रेस नव्हती. तर व्ही. पी. सिंग यांचे सरकार होते. भाजपाचे त्यांना सहकार्य होते. म्हणजेच भाजपाच्या सत्तेच्या काळात काश्मिरी पंडित बाहेर गेले असा आरोपही त्यांनी केला.

मतभेद, मतभिन्नता असू शकते. मात्र, परस्परांबाबत सन्मान असण्याची गरज आहे. गांधी, नेहरुंनी देशाला दिशा दिली, नुसते स्वातंत्र्य दिले नाही. देशाला महत्व देण्याचे काम यशवंतराव चव्हाणांनी केले. देशाला एकसंध ठेवायचे आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *