Breaking News

नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांचे आव्हान राम मंदिर निधी संकलनावरून काँग्रेस-भाजपामध्ये खडाजंगी

मुंबईः विशेष प्रतिनिधी

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी काही जणांकडून निधी संकलनाचे काम करण्यात येत आहे. मात्र निधी न दिल्यास धमकाविण्याचे प्रकार सुरु असून सकाळीच कुलकर्णी व्यक्तीने येवून यासंदर्भातील माहिती दिली. त्यामुळे राम मंदिरासाठी निधी गोळा करण्याचा ठेका यांना कोणी दिला असा सवाल काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी करत अशांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने अखेर सभागृहाचे कामकाज १० मिनिटासाठी तहकूब केले.

प्रश्नोत्तराच्या तासानंतर औचित्याच्या मुद्याद्वारे नाना पटोले यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्याच्या या उत्तरावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला.

यावेळी भाजपाचे सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांच्या बोलण्याला आक्षेप घेत अयोध्येतील राम मंदिरासाठी समर्पण निधी गोळा करण्याचे काम काही कार्यकर्त्ये करत आहेत. त्यासाठी नागरीकांकडून स्वतःहून निधी देत असल्याचे स्पष्ट केले.

त्यावर नाना पटोले यांनी हा निधी गोळा करण्याचा ठेका दिला कोणी? असा आक्षेप घेत सवाल केला.

त्यावर भाजपाचे सदस्य आक्रमक झाल्या गोंधळास सुरुवात झाली. अखेर त्यात हस्तक्षेप करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राम मंदिरासाठी लोकांकडून समर्पण निधी गोळा करण्याचे काम सुरु आहे. जर तुम्हाला खंडणी आणि समर्पण निधीमधील फरक कळत नसेल आणि तुम्हाला या प्रश्नावर चर्चाच करायची असेल तर खुशाल प्रस्ताव आणा आहे का हिम्मत प्रस्ताव आणण्याची असे प्रति आव्हान पटोलेंना दिले.

त्यावर पटोले यांनी मनोहर कुलकर्णी या व्यक्तीने आपणास सकाळी येवून माहिती दिली असून त्यांनी निधी दिला नाही म्हणून त्यास धमकाविण्याचे काम निधी गोळा करणाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. त्यानंतरही भाजपाचे सदस्य आक्रमक राहिल्याने आणि गोंधळ वाढल्याने अखेर विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सभागृहाचे कामकाज काहीवेळासाठी तहकूब केले.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *