Breaking News

फडणवीस म्हणाले, विश्रांती घ्यावी अशी परमेश्वरांची इच्छा असावी म्हणून कोरोनाची लागण संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे आणि विलगीकरणात राहण्याचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

काही दिवसांपूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सत्यनारायण यांनी ईश्वराच्या करणीमुळे देशात कोरोनाची साथ असल्याचे अजब तर्कट मांडले. त्याचधर्तीवर आता भाजपाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनीही सतत काम करत राहील्याने आपण विश्रांती घ्यावी ईश्वराची असावी म्हणून कोरोनाची लागण झाल्याचे अजब तर्कट मांडले. त्यामुळे ईश्वरामुळे कोरोनाची लागण झाली की बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजायला मार्ग नाही.

दरम्यान त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी आणि विलगीकरणात रहावे असे आवाहन त्यांनी केले.

बिहार निवडणूकीच्या जाहीर होण्याआधीपासून ते सातत्याने बिहारला जावून परत मुंबईला येत आहेत. त्यातच  त्यांच्यावर निवडणूकीच्या निमित्ताने त्यांच्यावर बिहारची जबाबदारी भाजपाने सोपविल्याने त्यांचा बहुतांष वेळ बिहारमध्येच जात आहे. तेथे आधीच  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत पुरेशी जनजागृती नाही. तसेच तेथील वैद्यकीय सुविधाही चांगल्या प्रतीच्या नसल्याने बिहारमधील जनता आधीच रामभरोसे आहे. त्यात आता देवेंद्र फडणवीस हे ही कोरोनाच्या अनुषंगाने पुरेशी काळजी घेताना दिसत नाहीत. यासंदर्भात त्यांचे काही फोटो व्हायरल झाले त्यात त्यांच्या सोबत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी मास्कच परिधान केले नसल्याचे आल्याचे वारंवार दिसून आले.

Check Also

अरविंदरसिंग लवली अखेर भाजपामध्ये दाखल

लोकसभा निवडणुकीसाठी आप AAP सोबतच्या युतीमुळे अलीकडेच दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणारे अरविंदर सिंग लवली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *