Breaking News

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेली मदत शेतकऱ्यांना फसविणारी भाजपाचे माजी कृषी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टीने थैमान घातले असताना हवालदिल शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने भरीव मदत करणे गरजेचे होते परंतु महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी १० हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीसाठी जाहीर केले तरी त्यामधील कृषी पिके घरे यासाठी ,५०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. जाहीर केलेल्या ,७७६ कोटी रुपयांपैकी रस्ते पुलासाठी ,६३५ कोटी रुपयेनगर विकाससाठी ३०० कोटी,  महावितरण करीता २३९ कोटी रुपयेजलसंपदा करीता १०२ कोटी रुपयेग्रामीण रस्ते पाणीपुरवठा करीता १००० कोटी रुपये कृषी शेती घरासाठी ,५०० कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहे म्हणजे शेतकऱ्यांना शेती पिकासाठी ,५०० कोटी रुपये अतिशय तुटपुंजी मदत जाहीर करण्यात आल्याची टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली.

मागील वर्षी तत्कालिन काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी  १०,००० कोटी रुपयांची मदत फक्त शेतकऱ्यांकरीता दिलेली होती. त्यावेळी बांधावर गेलेल्या उद्धव ठाकरें यांनी कोरडवाहूला २५,०००बागायतीला ५०,०००  फळबागांना  लाख रुपये देण्याची मागणी केली होती शरद पवार यांनी काटोल मध्ये हीच मागणी पुढे रेटली होती. परंतु आज मुख्यमंत्र्यांनी १०,००० रु. प्रति हेक्टर म्हणजे ४००० रु. प्रति एकर बागायती जिरायती पिकाकरिता घोषित केले आहे. खरडून वाहून गेलेल्या जमिनीचा उल्लेखही केला गेला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टोल धारकांच्या नुकसानभरपाई साठी १२५ कोटी रुपये तातडीने देऊ शकतात. कपिल सिब्बल सारख्या वकिलाला १० लाख रुपये प्रत्येक सुनावणीसाठी देऊ शकतात परंतु त्यांनी शेतकऱ्यांची ४००० रु. वर बोळवण केली आहे. मुख्यमंत्री दौऱ्यावर असताना ,८०० रु. धनादेश देऊन शेतकऱ्यांच्या दयनेय अवस्थेची थट्टा केली त्याचीच पुनरावृत्ती ह्या मदतीने केली आहे. द्यायचे ,५०० कोटी रुपये सांगायचे १०,००० कोटी रुपये ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने कर्ज काढावे आणि कोरडवाहुला २५,००० रुपये प्रति हेक्टरबागायतीला ५०,००० रुपये प्रति हेक्टर आणि फळबाग करिता  लाख रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत द्यावी बोललेले वचन पूर्ण करावे. तुटपुंजी मदत करून बोळवण केल्यास शेतकरी माफ करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

पीएम किसानचा १५ वा हप्ता मिळण्यासाठी ही कामे करणे अनिवार्य अन्यथा खात्यात पैसे येणार नाही

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *