Breaking News

Tag Archives: shivsena

विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आल्यानंतर संजय राऊत म्हणाले, मी तुरुंगात गेलेला माणूस… हक्कभंग आणला तर मी माझं म्हणणं मांडेन

संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी कोल्हापूरात बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला. त्यांच्या या विधानानंतर शिंदे-भाजपाने आक्रमक भूमिका घेत संजय राऊतां विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. तसेच सभागृहाच्या बाहेरही सत्ताधाऱ्यांनी आक्रमक भूमिका मांडत संजय राऊत यांच्यावर टीका केली. विधिमंडळात …

Read More »

शिंदे गटाच्या युक्तीवादावर न्यायालयाचा सवाल, वेगळा गट नसताना राज्यपालांनी बहुमत चाचणीचे आदेश कसे दिले राजकिय पक्षाच्या चिन्हावर निवडूण आलेला सदस्यांनी पक्षाकडे मांडायला हवा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीचा आज चौथा दिवस होता. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवशी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकिल कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. आजही दुपारी एक वाजेपर्यंत सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर लंच ब्रेक झाल्यावर नीरज कौल यांनी शिंदे गटाची बाजी मांडण्यासाठी युक्तिवाद सुरू केला. …

Read More »

एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा भरत गोगावले यांच्या प्रतोद निवडीलाच दिले आव्हान

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात अर्धवट राहिलेली सुनावणी आज सोमवारी २८ तारखेपासून पुन्हा सुरु झाली. आज ठाकरे गटाकडून काही मुद्दे राहिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत भरत गोगावले यांच्या प्रतोदच्या नियुक्तीला आव्हान …

Read More »

राहुल नार्वेकर म्हणाले, १० व्या परिशिष्टमध्ये स्पष्ट तरतूद हे संसदीय लोकशाहीसाठी महत्वाचे

निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षनाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला बहाल केल्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही याचिका दाखल करून घेण्याबाबत दोन दिवस युक्तीवाद ऐकल्यानंतर आज अखेर न्यायालयाने ठाकरे गटाच्या याचिका दाखल करून घेत सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान आगामी अर्थसंकल्पिय अधिवेशनाच शिंदे गटाकडून …

Read More »

फुटलेल्या आमदारांच्या गटाला प्रतोद बदलण्याचा अधिकार कोणी दिला? कपिल सिबल यांचा सवाल शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केले

शिवसेनेतील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात दुसऱ्या आठवड्यातील दुसऱ्या दिवशी नियमीतपणे सुनावणी सुरु आहे. आजच्या २२ फेब्रुवारी रोजी सुनावणीत शिवसेनेचे ठाकरे गट वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तीवाद केला. पक्ष कोणाचा, व्हीप कोण बजावणार, प्रतोद कोण आणि अन्य मुद्द्यांवर कपिल सिब्बल यांनी भाष्य केलं. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी पक्षाच्या व्हीपचं उल्लंघन …

Read More »

शिंदेच्या शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीत एक ठराव राष्ट्रवादीचा, दुसरा ठाकरेंचा आणि तिसरा भाजपाचा जूनेच ठराव नव्या शिवसेनेच्या कार्यकारणीत मंजूर

उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या विरोधात उठाव करत भाजपाच्या मदतीने शिवसेना पक्षावर दावा केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या ४० आमदार आणि १३ खासदारांच्या गटाला शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्य बाणचिन्ह देण्याचा निर्णय नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केला. त्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेची आज पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. मात्र या बैठकीत …

Read More »

संजय राऊत यांचा आरोप, खा श्रीकांत शिंदेंनी कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह यांना पत्र लिहून दिली माहिती

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याची माहिती राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली. याबाबत बोलताना …

Read More »

फडणवीसांची टीका, संजय राऊत हे निर्बुध्द… तर उद्धव ठाकरेंकडे ठराविक शब्दांची ‘डिक्शनरी’ एमपीएससीसंदर्भात राज्य सरकारचा सातत्याने पाठपुरावा

उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. पुणे येथे आगमन झाले असता ते माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी काल माध्यमांमध्ये दिलेल्या विधानांसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता फडणवीस बोलत …

Read More »

अमित शाह यांच्या त्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे काँग्रेस-राष्ट्रवादीला कधी कळणार… विरोधक म्हणून अमित शाह यांनी कोल्हापूरच्या जाहिर सभेत घेतले नाव

नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कोल्हापूरात झालेल्या जाहिर सभेत बोलताना आगामी निवडणूकीत शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष, राहुल गांधी यांची काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित, समाजवादी पार्टी आणि उध्दव ठाकरे यांची शिवसेना हे सर्वजण भाजपाच्या विरोधात एकत्रित येतील तरीही आपल्याला लोकसभेच्या ४८ च्या …

Read More »

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारः मात्र नियमित याचिकेसोबत यावरही सुनावणी घ्या

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत सर्वचस्तरातून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज सकाळी याचिका दाखल करत या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेता येत नसल्याचा निर्णय दिला. …

Read More »