Breaking News

एकनाथ शिंदे यांच्या त्या पत्राचा संदर्भ देत ठाकरे गटाचा सर्वोच्च न्यायालयात दावा भरत गोगावले यांच्या प्रतोद निवडीलाच दिले आव्हान

मागील आठवड्यात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयात अर्धवट राहिलेली सुनावणी आज सोमवारी २८ तारखेपासून पुन्हा सुरु झाली. आज ठाकरे गटाकडून काही मुद्दे राहिले होते. त्यानुसार ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी घटनापीठासमोरील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या एका पत्राचा संदर्भ दिला. तसेच या पत्राचा दाखल देत भरत गोगावले यांच्या प्रतोदच्या नियुक्तीला आव्हान देत ठाकरे गटाने शिंदे गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत म्हणाले, ३ जुलैला विधानसभा अध्यक्षांच्या आदेशाने भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना पत्र पाठवून त्यांना प्रतोद पदावरून काढल्याची माहिती दिली. तसेच, विधानसभा अध्यक्षांच्या परवानगीने एकनाथ शिंदेंना विधिमंडळ पक्षनेतापदी नियुक्ती झाल्याची माहिती या पत्रात दिली.

एकनाथ शिंदेंच्या एका पत्राच्या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावलेंची प्रतोदपदी नियुक्ती झाल्याच्या निर्णयाला मान्यता दिली, असं देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.

देवदत्त कामत पुढे म्हणाले, भरत गोगावलेंनी सुनील प्रभूंना ३ जुलै रोजी पाठवलेलं पत्र राजकीय पक्ष म्हणून पाठवलं नव्हतं. त्या पत्राच्या शेवटी ‘शिवसेना विधिमंडळ पक्ष’ असा उल्लेख होता. त्यामुळे प्रतोदची निवड राजकीय पक्ष करू शकतो की विधिमंडळ गट हा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो.

प्रतोदाची नियुक्त करणं हे संसदीय प्रणालीतलं काम नाही. मुळात हे सगळं प्रकरण प्रक्रियेमधील गैरव्यवहाराचं नसून प्रत्यक्ष राज्यघटनेच्या उल्लंघनाचं आहे, असा युक्तिवादही कामत यांचा सर्वोच्च न्यायालयात केला.

Check Also

मल्लिकार्जून खर्गे यांचे न्यायपत्रवरून पंतप्रधान मोदींना भेटण्यास उत्सुक

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने काँग्रेस भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे रणधुमाळी चांगलीच गाजत आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *