Breaking News

संजय राऊत यांचा आरोप, खा श्रीकांत शिंदेंनी कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी उपमुख्यमंत्री फडणवीस, अमित शाह यांना पत्र लिहून दिली माहिती

खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यातील एका कुख्यात गुंडाला माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिली, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी आज केला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुंबई आणि ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले असल्याची माहिती राऊत यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना धमक्या देण्याचे प्रमाण वाढले आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर माझी सर्व सुरक्षा व्यवस्था हटविण्यात आली होती. माझी त्याबद्दल तक्रार नाही. मात्र, मला एक गंभीर बाब तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे. ठाण्यातील एक कुख्यात गुंड राजा ठाकूर व त्याच्या टोळीला माझावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती मला मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रातील वातावरण बघता हा विषय आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक आहे, असे म्हणाले.

यासंदर्भात संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनाही पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटविण्यात आली होती. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंडांच्या टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले आहेत. मी याबाबत आपणास वेळोवेळी माहिती दिली आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे. ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर याला माझावर हल्ला करण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, ‘सामना’चा कार्यकारी संपादक, तसेच एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे, असं संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्याचे महाज्ञानी अतिमहाज्ञानी देवेंद्र फडणवीस यांना आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ठाणे आणि मुंबईचे पोलिस आयुक्तांना पत्र लिहीत याची माहिती दिलेली आहे. पण मी सुरक्षा मागणार नाही. जे शिंदे गटात गेले त्या आमदार-खासदारांना सुरक्षेची गरज आहे. त्यामुळे आम्हाची सुरक्षा काढून घेण्यात आल्याचा खोचक टोला लगावला.

मागील काही दिवसांपासून आम्हालाही आमच्या विश्वसनीय सूत्रांकडून माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती मिळत होती. माझ्याबरोबर आमचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनाही ही माहिती मिळत होती. तसेच ही सुपारी नुकतेच तुरुंगातून बाहेर पडलेला कुख्यात गुन्हेगार राजा ठाकूर यास देण्यात आली असून ही सुपारी ठाण्याचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी दिल्याची माहिती सातत्याने पुढे आल्याने आपण यासंबधी पत्र लिहिल्याचे सांगितले.

 

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *